आकाशगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:दीर्घिका

आकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या तारकासंघात आहे, त्या तारकासंघाचे (दीर्घिका) नाव आहे. तिचे आंतरराष्ट्रीय नाव मिल्की वे अर्थात दुधाळ मार्ग आहे. सूर्यमाला ही आकाशगंगेच्या केंद्रापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे. सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून अंदाजे २७७०० प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या केंद्रापासून सूर्य साधारण ३५००० प्रकाशवर्ष दूर आहे. [ संदर्भ हवा ]

सूर्य या तारकासंघाच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.

आकाशगंगा अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरुप, तिचा वैशिष्ट्यपुर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आकाशगंगेच्या एक टोकापासून निघलेला प्रकाशकिरण दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख वर्षाचा काळ लागतो[ संदर्भ हवा ]. आपली अंधार दाटलेल्या रात्री निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा.

[संपादन] आकाशगंगेचा जन्म

[संपादन] ग्रीक लोककथा

आपल्या आकाशगंगेची एक ग्रीक गोष्ट अशी आहे की, एके काळी ज्युपिटर देवाची पट्टराणी, जुनो, आपल्या मुलाला हर्क्युलसला स्तनपान करीत होती. हर्क्युलस अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असताना हर्क्युलसचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही त्याचा दुधाळ पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये