मिथेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिथेन-

रेणुसूत्र-CH4

रेणूचे वस्तुमान=१६

आढळ

१)नैसर्गिक वायूमध्ये मिथेन ८७% आढळतो.

२)बायोगॅसमध्येही मिथेन आढळतो.

३)प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनोऑक्साईड यांचे मिश्रण ३००℃ला निकेल या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तापावल्यास मिथेन गॅस तयार होतो.

४)नैसर्गिक वायूच्या भंजक प्रक्रियेने मिथेन गॅस तयार होतो.

मिथेनचे भौतिक गुणधर्म-

१)द्रवनांक =-१८५.५℃

२)उत्कलनांक=-१६१.५℃

३)हा वायू रंगहीन आहे.

४)द्रवरूप मिथेनची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

५)मिथेन पाण्यामध्ये कमी प्रमाणात द्रावणीय आहे तर अल्कोहोल,गॅसोलीन,इथर यासारख्या सेंद्रिय द्रावकांमध्ये जास्त द्रावणीय आहे.

६)कक्ष तापमानाला मिथेन वायुरूपात असतो.

हा एक ज्वलनशील वायू आहे. कार्बन आणि हायड्रोजन यांचे संयुग असलेला हा वायु इंधन म्हणून वापरला जातो.हे कार्बनचे सर्वात साधे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. त्यास मार्श गॅस ही म्हणतात कारण दलदलीच्या भागात प्राणी आणि वनस्पतींच्या अपघटनाने तयार होऊन तो बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडतो. हरितगृह परिणाम निर्माण करणाऱ्या CO2 प्रमाणेच मिथेन हवेतील वायूचे रेणू जमिनीतुन बाहेर पडणाऱ्या उष्णतेची प्रारणे शोषून घेतात. मिथेन रेणू Co2च्या 20पटीने जास्त उष्णता शोषतात.

मिथेनचे उपयोग-

१)वायुरूपतील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग,कागदनिर्मिती,अन्नप्रक्रिया उद्योग,पेट्रोल उद्योगांमध्ये होतो.

२)घरगुती वापरामध्ये इंधन म्हणून वापर होतो.

३)इथेनॉल,मेथाईल क्लोराईड ई.च्या निर्मितीमध्ये मिथेनचा उपयोग होतो.