असिन तोट्टुंकल
| असिन तोट्टुंकळ (मल्याळम: അസിന് തോട്ടുങ്കല്.) |
|
| चित्र:Asin mr.jpg असिन तोट्टुंकळ |
|
| पूर्ण नाव | असिन जोसेफ तोट्टुंकळ |
| जन्म | ऑक्टोबर २६ १९८५ [वय् २४ वर्षे] कोच्ची , केरळ |
| अन्य नाव/नावे | मलबार अळगी,चेन्नै,तमिळ अम्मायी . |
| कार्यक्षेत्र | चित्रपट,जाहिरात. |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मल्याळम |
| कारकिर्दीचा काळ | सन २००१-पासुन |
| प्रमुख चित्रपट | गजनी (चित्रपट) |
| पुरस्कार | फिल्मफेअर,स्टारडस्ट,स्क्रीन,IIFA,ITFA इत्यादी. |
| वडील | जोसेफ तोट्टुंकळ |
| आई | सेलीन तोट्टुंकळ |
हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)
अनुक्रमणिका |
[संपादन] व्यक्तिगत परिचय
असिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന് തോട്ടുങ്കല് ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात)
हि एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे.प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते.मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगू तील सुरूवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते.असिन हि केरळ राज्याच्या युथ आयकॉन ची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे. तेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारम व हिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट,जो तमिळ ,त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.
[संपादन] पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण
मूळची केरळ ची असणारी असिन ,केरळी कॅथॉलिक कुटुंबातील असून तिची मातृभाषा मल्याळम आहे,त्या व्यतिरीक्त तिचे तमिळ,संस्कृत,तेलुगु,इंग्रजी,हिंदी तसेच फ्रेंच भाषांवर प्रभुत्व आहे,मुंबईत आल्यानंतर ती मराठी देखील शिकली आहे असे तिने एका मुलाखतीत नमुद केले.असिन हि आपल्या नावाचा अर्थ 'शुद्ध' किंवा 'पापरहित' असा सांगतात. तिच्या नावातील ’अ’(A)हे अक्षर संस्कृत मधुन घेण्यात आले असून ’सिन’ (Sin-पाप) हे इंग्रजी भाषेतुन घेतले आहे.दोहोंचा मिळुन ’अ+सिन’ ,पापरहित असा होतो.चित्रपटात येण्यापूर्वी असिन ने स्थानिक कंपन्यांच्या जाहिरातीतून काम केले आहे,तसेच काही नामांकित कंपन्यांची "ब्रँड अम्बॅसेडर" देखील आहे.
[संपादन] जाहिराती आणि ब्रँड अम्बॅसेडरशीप
- स्पिंझ ,टॅल्कम पावडर.
- मिरिंडा, शीतपेय.
- फेअरेव्हर,फेअरनेस क्रिम.
- बिगबझार,फॅशन@बीगबाजार.
- पॅराशुट, तेल(मॅरिको),हेअर ऑईल.
- क्लिनीक ऑल क्लिअर,हेअर शँपू.
- अरिआ ज्वेलरी,दागिने अलंकार.
- तनिश्क,दागिने अलंकार.
- टाटा स्काय,डी.टी.एच.सेवा.
- बिग ९२.७ एफ़.एम,रेडिओ सेवा.
- कोलगेट मॅक्सफ़्रेश,टूथपेस्ट.
- अमृतांजन,पेनबाम.
- शुअर डिओ,डिओडरंट स्प्रे.
[संपादन] चित्रपट कारकिर्द
[संपादन] हेसुद्धा पाहा
[संपादन] संदर्भदूवे
- http://en.wikipedia.org/wiki/Asin#References (ह्या लेखातील सर्व संदर्भ मुळ इंग्लिश भाषा व तमिळ लेखातून घेतले आहेत.)
[संपादन] बाह्य दुवे
- http://beta.esakal.com/2009/01/16165132/girl-next-door.html ("सकाळ" ला दिलेली मुलाखत)
- * साचा:Imdb name (आयएमडीबी वरील पृष्ठ)