"मोहोरवणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३१: ओळ ३१:


[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]
[[वर्ग:कोकणातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:कोकणातील खाद्यपदार्थ]]

१५:०१, २० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

साहित्य

  1. कैऱ्या
  2. मोहरी
  3. हिरव्या मिरच्या
  4. गूळ
  5. नारळ
  6. मिठ

फोडणीचे साहित्य

  1. साजूक तूप
  2. जिरं

पूर्व तयारी

प्रथम कैऱ्या उकडून घ्यायच्या व त्याचा पन्ह्याला काढतो तसा गर काढायचा. त्यात कैऱ्यांच्या आंबटपणानुसार (काही कैऱ्या ह्या फारच आंबट असतात तर काही त्या मानाने इतक्या आंबट नसतात,) गूळ घालायचा व अंदाजाने मीठ घालावे व ते मिश्रण डावाने सारखे करून ठेवावे.

कृती

वाटणाचा क्रम - प्रथम मिक्सरमध्ये मोहरी, थोडे मीठ, मिरच्या व किंचित पाणी घालून ते मिश्रण नीट वाटून घ्यावे! थोडे पाणी घातल्याने मोहरी छान चढते.

वरील मिश्रण चांगले वाटून झाले की त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटीभर खोवलेला ताजा नारळ घालावा व घातलेल्या नारळासकट पुन्हा ते मिश्रण नारळ उत्तम वाटला जाईपर्यंत वाटावे. त्यानंतर पूर्वतयारीत सांगितल्याप्रमाणे कैऱ्या-गूळ-मिठाचे‍ सारखं करून ठेवलेले मिश्रण मिक्सरमध्ये घालावे आणि सगळेच मिश्रण पुन्हा एकदा अगदी एकजीव होईपर्यंत वाटावे.

त्यानंतर त्या वाटणात भातासोबत जेवता येईल इतपत किंवा कढीइतपत पात्तळ होईल तितके पाणी घालावे. पाणी घातल्यानंतर ते मिश्रण डावेने छान ढवळून घ्यावे व वरतून साजूक तूप -जिऱ्याची चांगली चरचरीत फोडणी द्यावी! (गॅसवर गरम करू नये.)

झाली मोहरवणी[ चित्र हवे ] तयार.

इतर माहिती

'चुलीवरचा गरमागरम भात, त्यावर मोहरवणी आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड' असा खास कोकणातला हा मेनू आहे.

बाह्य दुवे