"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 40 langlinks, now provided by Wikidata on d:Q200119
छो वर्ग:उज्जैन टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ १२: ओळ १२:
[[वर्ग:भारतातील ऐतिहासिक शहरे]]
[[वर्ग:भारतातील ऐतिहासिक शहरे]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन शहरे]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन शहरे]]
[[वर्ग:उज्जैन]]

१९:५१, १५ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

मंगळनाथ मंदिर, उज्जैन

उज्जैन(उज्जयिनी) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

महांकाळाचे मंदिर
मंदिराचे प्रवेशद्वार

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.

मंदिरातील शिवाची पिंड

मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.