"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो clean up, replaced: स्तोत्र → स्रोत using AWB
छो Salveramprasad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख छगन भुजबळ वरुन छगन चंद्रकांत भुजबळ ला हलविला: पूर्ण नाव
(काही फरक नाही)

१८:२९, २५ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

छगन चंद्रकांत भुजबळ

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ येवला

जन्म १५ ऑक्टोबर इ.स. १९४७
नाशिक
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पत्नी मीना
अपत्ये पंकज भुजबळ :आमदार
निवास मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.
धर्म हिंदू
विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य
छगन भुजबळ
कॅबीनेट
सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य


छगन चंद्रकांत भुजबळ (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.

भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.

जीवन परिचय

  • जन्म -

१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस होता.

  • १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
  • मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम.
  • वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
  • १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
  • १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.

आवड

  • चित्रपट आणि क्रिकेट हे आवडीचे विषय आहेत.

योगदान

त्यांनी दैवत (१९८५) आणि नवरा बायको (१९९०) या दोन मराठी चित्रपटांची निमिर्तीही केली.

संपर्क

  • कायमस्वरूपी पत्ता-

मिलिशिया अपार्टमेंट, म्हातारपाखाडी रोड, माझगाव, मुंबई-४०००१०.

  • शासकीय निवासस्थानाचा पत्ता -

रामटेक, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६. (दूरध्वनी : मंत्रालय कार्यालय - २२०२५०१४ आणि २२०२४०१, फॅक्स २२०२४८७३,

  • निवासस्थान-

रामटेक २२६३०६४० आणि २२६३१६८८).

बाह्य दुवे

महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील छगन भुजबळ यांच्यावरील लेख