Jump to content

विजयनगरचे साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजयनगरचे साम्राज्य
ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ
इ.स. १०८२इ.स. १६४६
ध्वज
राजधानी विजयनगर (हंपी)
शासनप्रकार राजेशाही
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: बुक्क भूपती राय (प्रथम) (इ.स. १०८२-१०८७)
अंतिम राजा: श्रीरंग (तृतीय) (इ.स. १६४२-१६४६)
अधिकृत भाषा कन्नड भाषा
इतर भाषा तमिळ, मल्याळम
राष्ट्रीय चलन विजयनगर रुपये

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य राजवीर समाज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्का यांनी मुहम्मद तुघलक या हरवून त्याला पूर्ण नामहरम करत होते. मुहम्मद तुघलक हरल्यावर कृष्णा नदीतुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन केले. लवकरच त्यांनी उत्तरेकडील कृष्णा नदी आणि दक्षिणेस कावेरी नदीच्या दरम्यान संपूर्ण प्रदेशावर आपले साम्राज्य तयार केले. विजयनगर साम्राज्याच्या वाढत्या शक्तीमुळे या तत्कालिन इस्लामी आक्रमकांना आपल्या राज्यात पराभूत व्हावे लागले. आणि तेथून त्यांना पळ काढावा लागला. बहामनी राज्याशी वारंवार युद्ध केले आणि त्यांना पराभूत करून सोडले. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वी झाले.

विजयनगर घराणे

[संपादन]

विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होता महाराज कृष्णा देव राया. विजयनगर राजघराणे आपल्या कारकिर्दीत वैभवाच्या शिखरावर पोहोचले. त्याने लढलेल्या सर्व लढायांमध्ये हे राजे यशस्वी झाले. हे एकूण पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य करत होते. महाराष्ट्र हा राजा हरिहर यांच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता राजा कंप. यांचे उदयगिरी नावाचे राज्य होते. मधला भाऊ राजा बुक्क. त्यांच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार असत असे. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले हिंदू साम्राज्य उभे केले . राजा बुक्करायांचा कंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका कम्पराजविजयम् या संस्कृत काव्यग्रंथात आली आहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर राजा दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले. हस्तिनावती ही त्यांची राजधानी होती. हरिहर बुक्क हे विद्यारण्यस्वामी ह्यांचे शिष्य होते

व्यापार

[संपादन]

राजा कृष्णादेव राय यांनी पाश्चात्य देशांशी व्यापार करण्यास प्रोत्साहित केले. पोर्तुगीजांशी त्यांचे चांगले संबंध होते.

समृद्धी व भरभराट

[संपादन]

राजा कृष्णादेव राय केवळ एक महान योद्धा नव्हता तर कला कलेचा अभ्यासक आणि शिक्षणाचे उत्तम संरक्षकही होता. त्यांच्या कार्यकाळात तेलुगू साहित्याची, चित्रकला, शिल्पकला, नृत्य आणि संगीताची भरभराट झाली. विजयनगर बद्दल पर्शियन प्रवासी 'अब्दुल रझाक' यांनी लिहिले की, "विजयनगर हे जगातील सर्वात भव्य शहरांपैकी एक असल्याचे दिसते.[]

विजयनगर घराणे राज्य / प्रदेश कालावधी
पहिली पिढी

पाच भावंडे

भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य
हरिहर महाराष्ट्र
बुक्क होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश
कंप उदयगिरी
शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार
दुसरी पिढी
कंपराय

(बुक्करायाचा मुलगा)

वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले.

वंशावळ

[संपादन]
पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे चार शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.
  • बुक्क भूपति राया १०८२-१०८७
  • हरिहर राया- पहिला १०८७-११०४
  • बुक्क महाराया ११०४-११२६
  • सदाशिव राया ११२६-११५२
  • पुरंदर राया ११५२-१२०७
  • प्रताप देव राया १२०७-१२२७
  • वीर प्रताप देवराया १२२७-१२४२
  • प्रताप वेंकट राया १२४२-१२५१
  • बुक्क भूपति राया- दोन १२५१-१२६०
  • हरिहर राया- दोन १२६०-१२८०
  • बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला १२८०-१२८५
  • युवराजा कुमार कंपना राया १२८५-१२९०
  • देव राया -१ १२९०
  • गुंडम्मा राया १२९०
  • बुक्क राया- पहिला १२९०-१२९४
  • संगमा राया १२९४
  • हरिहर राया- तीसरा १२९४
  • युवराजा कुमार कंपना राया १२९४
  • बुक्क राया- दोन १२९४-१२९५
  • बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला १२९५-१३०४
  • अभिनवा बुक्क राया १३०४-१३०६
  • बुक्क राया- दोन १३०६-१३२२
  • बुक्क राया- तृतीय १३२२-१३३०
  • नरसिंम्हा राया १३३०-१३३२
  • देव राया- द्वितीय १३३२-१३३९
  • मल्लिकार्जुन राया १३३९-१३४८
  • अच्युत देवराया १३४८-१३६०
  • कृष्ण राया १३६०-१३८०
  • यीम्मड़ी हरिहर राया १३८०-१३९०
  • देव राया- २ १३९०-१४०४
  • बुक्क राया-४ १४०४-१४०५
  • वीरूपाक्ष राया-१ १४०५-१४०६
  • देव राया- ३ १४०६-१४२२
  • रामचंद्र राय वीर १४२२
  • वीर विजय बुक्क राय १४२२-१४२४
  • देव राय २ १४२४-१४४६
  • त्र्यंबक राया १४४६-१४६०
  • मल्लिकार्जुन राय १४६०-१४६५
  • विरुपक्ष राय २ १४६५-१४८५
  • प्रौढ राय १४८५
सालुव घराणे
  • नरसिंहदेवरायः इ.स. १४८५-१४९१
  • तिम्मा भूपाल: १४९१
  • नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलुव घराणे
  • नरसानायकः १४९१-१५०३
  • वीरनरसिंहरायः १५०३-१५०९
  • कृष्णदेवरायः १५०९-१५२९
  • अच्युतदेवरायः १५२९-१५४२
  • सदाशिवरायः १५४२-१५७०
अरविदू घराणे
  • अलियरामरायः १५४२-१५६५
  • तुरुमलदेवरायः १५६५-१५७२
  • श्रीरंग-१: १५७२-१५८६
  • वेंकट-२: १५८६-१६१४
  • श्रीरंग-२: १६१४
  • रामदेव: १६१७-१६३२
  • वेंकट-३: १६३२-१६४२
  • श्रीरंग-३: इ.स. १६४२-१६४६.

इ .स. १३२३ मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने जिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांची सुटका करून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले.

विरूपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिंहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली. प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९) याच वंशाचा होता.

विजयनगरवरील पुस्तके

[संपादन]
  • विजयनगर हृदयस्थ साम्राज्य - लेखक- डाॅ. अस्मिता हवालदार, प्रकाशन वर्ष २०१९. प्रकाशक, काँटिनेंटल प्रकाशन ,पुणे

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "विजय नगर साम्राज्य | भारतकोश". m.bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2021-06-01 रोजी पाहिले.