वज्र
हिंदू व बौद्ध परंपरांनुसार वज्र (संस्कृत: वज्र ; चिनी: 金剛, चिंगांग ; तिबेटी: རྡོ་རྗེ། , तोर्जे ; जपानी: 金剛 ; दोक्को) हे एका प्रकारच्या शस्त्राचे नाव आहे. वस्तू म्हणून पाहता, हे हातात पकडता येण्याजोगे धातूचे शस्त्र असते. हिंदू, बौद्ध व जैन मतांनुसार वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानले जाते. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत याला अविभाज्य स्थान आहे.
तसेच भारतात प्राचीन काळी व तिबेट, भूतान, थायलंड इत्यादी बौद्धमतप्रभावित देशांत वज्र हे पुरुषांसाठीचे व्यक्तिवाचक नाव म्हणूनही वापरण्याची रीत आहे.
सांस्कृतिक संदर्भ
[संपादन]हिंदू परंपरेतील संदर्भ
[संपादन]देवांचा राजा इंद्र याचे शस्त्र होते. महर्षि दधिची यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकली. हे शस्त्र त्यांचा अस्थींपासून निर्मिले होते. या शस्त्राचा वापर करून इंद्राने वृत्राचा निप्पात केला; तसेच स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावत युद्धे जिंकली.
चित्रदालन
[संपादन]-
दोन वज्रे असलेले भूतानाचे राजचिन्ह
-
थायलंडाचा भूतपूर्व राजा सहावा राम याच्या वज्रांकित राजचिन्हाचे नमुनाशिल्प.
-
हाती वज्र धरलेला तिबेटी बौद्ध धर्मगुरू (इ.स. १९३८)
-
वज्रधारी बोधिसत्वाची - अर्थात वज्रसत्त्वाची - तिबेटी मूर्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |