Jump to content

येलेना ओस्तापेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(येलेना ओस्तापेंको या पानावरून पुनर्निर्देशित)
येलेना ओस्तापेन्को
देश लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
जन्म ८ जून, १९९७ (1997-06-08) (वय: २७)
रिगा, लात्व्हिया
उंची ५ फुट ९ इंच
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $३५,९९,७६६
एकेरी
प्रदर्शन 371–226
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १२ (१२ जून २०१७)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १२
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (२०१७)
फ्रेंच ओपन विजेती (२०१७)
विंबल्डन दुसरी फेरी (२०१५)
यू.एस. ओपन दुसरी फेरी (२०१५)
दुहेरी
प्रदर्शन 236–153
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१७.


येलेना ओस्तापेन्को (लात्व्हियन: Jeļena Ostapenko; ८ जून १९९७) ही एक व्यावसायिक लात्व्हियन टेनिसपटू आहे. २०१७ सालची फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून ओस्तापेन्को ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत विजय मिळवणारी पहिलीच लात्व्हियन टेनिस खेळाडू ठरली. एका अन-सीडेड महिला टेनिस खेळाडूने फ्रेंच ओपन जिंकण्याची १९३३ सालानंतर ही पहिलीच वेळ होती. ह्या विजयामुळे ओस्तापेन्को डब्ल्यू.टी.ए. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर पोचली.

ओस्तापेन्को आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आना इसाबेल मेदिना गारिगेस ही माजी टेनिस खेळाडू सध्या ओस्तापेन्कोची प्रशिक्षक आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेती २०१७ फ्रेंच ओपन मातीचे रोमेनिया सिमोना हालेप 4–6, 6–4, 6–3

बाह्य दुवे

[संपादन]