Jump to content

म.अ. मेहेंदळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म. अ. मेहेंदळे
जन्म नाव मधुकर अनंत मेहेंदळे
जन्म १४ फेब्रुवारी १९१८
शिक्षण पीएचडी
कार्यक्षेत्र प्राच्य विद्या, ऐतिहासिक भाषाविज्ञान
भाषा मराठी
पुरस्कार साहित्य अकादमीचा भाषा-सन्मान-पुरस्कार

डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी १९१८; - पुणे, १९ ऑगस्ट २०२०)[] हे संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित होते. त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

शिक्षण

[संपादन]

मेहेंदळे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि नंतर १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून पीएच.डी. संपादन केली. काहीच वर्षांत त्यांचा प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण हा पीएचडीचा शोधप्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे त्यांनी वयाच्या तिशीतच साध्य केले.

पीएच.डी झाल्यावर त्यांनी कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमधील महाविद्यालयांत ब त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय शिकवला. त्यांनी जर्मनी आणि अमेरिकेतील संस्थांमध्येही अभ्यास केला.

मेहेंदळे यांनी १९४१साली आंतरजातीय विवाह केला.

डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. रा.ना. दांडेकर यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले. तेथे त्यांनी महाभारतावर कोणताही मोबदला न घेता संशोधन केले.

मेहेंदळयांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात गेली अनेक दशके संशोधनाचे काम केले.[ संदर्भ हवा ] त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसाठी महाभारताच्या चिकित्सक संपादित आवृत्तीसाठी आणि महाभारताची सांस्कृतिक सूची या विषयांवर काम केलेले आहे. डॉ. मेहेंदळे यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध संदर्भासाठी उपयुक्त आहेत. शब्द आणि त्यांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ यांवरही त्यांचे निबंध आहेत. सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आणि मुंडकोपनिषदातील सत्यमेव जयते नानृतं यांतील संदर्भानुसार बदलणारा अर्थ त्यांनी दाखवून दिला आहे. प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती या विषयावरील त्यांच्या व्याख्यानमालेला वाईच्या प्राज्ञपाठशाळेने छापले व याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये महाभारतातील कथा, रूपके तसेच वेदांतील वृत्र कथा, वेद आणि अवेस्था अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण परंतु समजण्यास सोप्या अशा पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.

मेहेंदळे यांनी संस्कृत, प्राकृत, महाभारत, अवेस्ता अशा विषयांवर त्यांनी केलेल्या एकूण संशोधनकार्याची माहितीची खानेसुमारी केल्यास एक ग्रंथ निर्माण करता येईल.[ दुजोरा हवा] कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स हे त्यांचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मेहेंदळे यांनी मराठी, इंग्लिश आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध लिहिलेले आहेत.

निवडक ग्रंथ

[संपादन]
  • अशोकाचे भारतातील शिलालेख (मराठी, १९४८)
  • कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी)
  • खेळ मांडियेला : लहानात घुटमळणाऱ्या महानाची कहाणी (अनुवादित, मूळ हिंदी लेखिका - व्हर्जिनिया एम. ॲक्सलिन; सहअनुवादक - डॉ. संजय ओक)
  • डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)
  • मराठीचा भाषिक अभ्यास (मराठी)
  • रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)
  • वरुणविषयक विचार (मराठी)
  • वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स (इंग्रजी)
  • प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती (मराठी)
  • हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व (२२ फेब्रुवारी २०१७)[]
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार (४-१०-२०१७)[]
  • मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व

संदर्भ

[संपादन]
  1. ^ author/online-lokmat (2020-08-19). "ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन". Lokmat. 2020-08-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Announcement : Honorary Membership to Prof. M. A. Mehendale". www.bori.ac.in. 2020-08-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ पालकर, २०१७.

संदर्भसूची

[संपादन]
  • मेहेंदळे, लीना. "Dr. Madhukar Anant Mehendale – A biographical sketch". संस्कृत की दुनिया : कौशलम् न्यास (इंग्लिश भाषेत). ३१ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "Certificate Course in Introduction to Linguistics". www.dcpune.ac.in. 2017-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-19 रोजी पाहिले.