Jump to content

भाषांतरित-रूपांतरित नाटके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम शेक्सपियरच्या ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झाली आहेत.त्या सर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर शेक्सपियर या लेखात आली आहे. त्याशिवाय अन्य अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.

मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :

नाटकाचे नाव मराठी रूपांतरकार मूळ नाटक भाषा त्याचा लेखक
अजब न्याय वर्तुळाचा चिं.त्र्यं. खानोलकर द कॉकेशियन चॉक सर्कल जर्मन ब्रेख्त
ॲंटिगॉन श्रीराम लागू ॲंटिगॉन ग्रीक सोफोक्लीज
अडीच घरे वजिराला यशवंत केळकर मेघ बंगाली उत्पल दत्त
अंमलदार पु.ल. देशपांडे द गव्हर्नमेन्ट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल रशियन निकोलाय गोगोल
आई माधव मनोहर मदर इंग्रजी कॅरेल कॅपोक
आंधळ्याची शाळा श्रीधर वर्तक ग्वॉन्टलेट इंग्रजी बायरसन (?)
आधे अधुरे विजय तेंडुलकर आधे अधुरे हिंदी राकेश मोहन
आनंद वि.वा.शिरवाडकर आनंद(चित्रपट) हिंदी
उत्तम रामचरित्र श्रीपाद बेलवलकर उत्तररामचरित्र संस्कृत भवभूती
उत्तम रामचरित्र नाटक परशुराम गोडबोले उत्तम रामचरित्र संस्कृत भवभूती
उद्याचे जग मधुसूदन कालेलकर मदर इंग्रजी कॅरेल कॅपोक
उसना नवरा ना.धों. ताम्हनकर हर स्टेप हजबंड इंग्रजी लॅरी जॉन्सन
एक झुंज वाऱ्याशी पु.ल देशपांडे द लास्ट अपॉइन्टमेन्ट(कथा) रशियन
एक रात्र, अर्धा दिवस(पवित्र ज्योति) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
एक होती राणी श्रीराम लागू La regina egle in sorti इटालियन ऊगो बेट्टी
एका रात्रीचा घोटाळा मारुती पाटील शी स्टूप्स टु कॉंकर इंग्रजी गोल्ड स्मिथ
एवम्‌ इंद्रजित अरविंद देशपांडे एवम्‌ इंद्रजित बंगाली बादल सरकार
ओझ्यावाचून प्रवासी शांता वैद्य द ट्रॅव्हेलर विदाउट लगेज (अ व्हॉयेजर सीम्स बॅग्ज) फ्रेन्च ज्याँ अनुई
कवडीचुंबक प्र.के. अत्रे ला व्हार (द मायझर) फ्रेन्च मोलियर
कमला य.ना. टिपणीस थेल्मा(कादंबरी) इंग्रजी मेरी कॉरेली
कमळेचे लग्न (कपट विवाह) वि.सी. गुर्जर ल अमूर मेन्डसे फ्रेन्च मोलियर
काचेची खेळणी वसंत कामत द ग्लास मेनाजेरीज इंग्रजी टेनेसी विल्यम्स
कार्टी प्रेमात पडली रत्‍नाकर मतकरी द स्मॉल बॅचलर (कादंबरी) इंग्रजी पी.जी.वुडहाउस
कार्टी श्रीदेवी वसंत सबनीस आय वॉन्ट टु बी इन पिक्चर्स इंग्रजी नील सायमन
कीर्तिसिंह (संगीत) आचार्य मार्तंड द टेलिस्मन इंग्रजी वॉल्टर स्कॉट
कुटाळकंपू वि.बा.आंबेकर द स्कूल फॉर स्कॅन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
कृष्णाकुमारी बापू भावे कृष्णाकुमारी(कादंबरी) बंगाली मायकेल दत्त
कोंडी अशोक शहाणे अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
कौटिल्य के. नारायण काळे मुद्राराक्षसम्‌ संस्कृत विशाखादत्त
खुर्च्या वृंदावन दंडवते चेअर्स इंग्रजी आयेनेस्को
खून पहावा करून सरिता पदकी नॉट इन द बुक इंग्रजी ऑर्थर वॅटकिन
गगनभेदी वसंत कानेटकर ऑथेल्लो+किंग लिअर+मॅकबेथ+हॅम्लेट इंग्रजी विल्यम शेक्सपियर
गंभीर घटना गोविंदराव टेंबे दि इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट इंग्रजी ऑस्कर वाइल्ड
गर्वनिरसन (सुंदरी) गोविंद काळे लेडी ऑफ लिऑन्स इंग्रजी लॉर्ड लिन्टन
गुरूबाजी र.धों. कर्वे ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
गृहपाश न.का. घारपुरे हायमाट जर्मन सुंडरमान हेरमान
गोची सदानंद रेगे गॉन आउट पोलिश तादोझ रूझिविच
गौराई व्यंकटेश माडगूळकर द रोझ टॅटू इंग्रजी टेनेसी विल्यम्स
घरकुल अनंत काणेकर डॉल्स हाउस इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
चंद्र जेथे उगवत नाही वि.वा. शिरवाडकर रिसरेक्शन रशियन टॉलस्टॉय
चंद्र नभीचा ढळला पुरुषोत्तम दारव्हेकर कॅलिगुला आल्बर्ट कामू
चंद्रशेखर (समर्थ भिकारी) भा.वि. वरेरकर साइन ऑफ द क्रॉस इंग्रजी बॅरेट विल्सन
चांगुणा आरती हवालदार(मानसी कणेकर) यर्मा स्पॅनिश फेडरिको गार्सिया लॉर्की
चित्रांगदा रामचंद्र व हेमचंद्र चित्रे चित्रा बंगाली रवींद्रनाथ टागोर
चेहरे आणि मुखवटे पद्माकर गोवईकर द मास्क अँड द फेस फ्रेन्च लुइजी चिआरली
जनावर शं.ना.नवरे इंग्रजी एडवर्ड आल्बी
जबरीचा विवाह ह.ना. आपटे ल मरिआन फोर्से फ्रेन्च मोलियर
जयध्वज(असूयाग्निशमन) ह.ना. आपटे हेर्नानी फ्रेन्च व्हिक्टर ह्यूगो
जळते शरीर ह.वि. देसाई घोस्ट्‌स इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
जुलूस अमोल पालेकर जुलूस बंगाली बादल सरकार
ज्याचे होते प्राक्तन शापित सदानंद रेगे मॉर्निंग बिकम्स एलेक्ट्रा ओनील यूजीन
ज्वालेत उभी मी अनिल जोगळेकर कॅट ऑन अ हॉट टिन रूफ इंग्रजी टेनेसी विल्यम्स
झुंज अनंत काणेकर स्ट्राइफ इंग्रजी गॉल्स वर्दी
डाकघर काशीनाथ भागवत पोस्ट ऑफिस बंगाली रवींद्रनाथ टागोर
डॉक्टर हुद्दार श्री.ना. पेंडसे डर्टी हॅन्ड्स फ्रेन्च ज्याँ पॉल सात्र
तलेदंड उमा कुलकर्णी तलेदंड कानडी गिरीश कर्नाड
तक्षशिला श्री.वि. वर्तक द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गोलॅन्ड इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
तीन पाशेर पाला (बंगाली) शंभू मित्र थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
तीन पैशाचा तमाशा पु.ल. देशपांडे थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
ती फुलराणी पु.ल. देशपांडे पिग्मॅलियन इंग्रजी जॉर्ज बर्नार्ड शॉ
तुघलक विजय तेंडुलकर तुघलक कानडी गिरीश कर्नाड
तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळी न.चिं.केळकर द रायव्हल्स इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
दुर्गा गो.ब. देवल फेटल मॅरेज इंग्रजी इसाबेला
दूरचे दिवे वि.वा. शिरवाडकर आयडियल हजबंड इंग्रजी ऑस्कर वाइल्ड
देवाजीने करुणा केली व्यंकटेश माडगूळकर द गुड वुमन ऑफ सेत्सुआन जर्मन बर्टोल्ट ब्रेख्त
धूर्तविलसित ह.ना. आपटे फ्रेन्च मोलियर
नागमंडल राजीव नाईक नागमंडल कानडी गिरीश कर्नाड
नाटककाराच्या शोधात सहा पात्रे माधव वाटवे सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर इटालियन लुइगी पिरॅंदेलो
निशिकांताची नवरी अनंत काणेकर शी स्टूप्स टु कॉंकर इंग्रजी गोल्ड स्मिथ
निळावंती वसंत सबनीस Der blaue Engel (कादंबरी) जर्मन हेनरिच मान
पंडित विद्याधर दिवाकर फ्राउस्ट इंग्रजी गटे
पतंगाची दोरी अनंत काणेकर व्हॉट एव्हरी वूमन नोज इंग्रजी जेम्स बेरी
परी तू जागा चुकलासी ह.रा. महाजनी अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हे्न्‍रिक इब्सेन
पवित्र ज्योति (एक रात्र, अर्धा दिवस) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
पांथस्थ सरिता पदकी आ: ! वाइल्डनेस इंग्रजी ओनील यू्जीन
पिझॅरो ना.के.बेहेरे पिझॅरो इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
पिठाचा कोंबडा उमा कुलकर्णी हिट्टीन हुंजा कानडी गिरीश कर्नाड
प्रणयविवाह त्रिं.वि. मोडक ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
प्रतापराव आणि चंद्रानना नारायण कानिटकर केनेल वर्थ इंग्रजी वॉल्टर स्कॉट
प्रयोजन के.नारायण काळे द पर्पज इंग्रजी त्यागराज कैलासम्‌
प्रीती परी तुजवरती राजाराम हुमणे मॅरेज गो राउंड इंग्रजी लेस्ली स्टीव्हन्स
प्रेमध्वज कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर द टेलिस्मन इंग्रजी वॉल्टर स्कॉट
प्रेषिताचे पाय मातीचे पद्माकर गोवईकर सलोमी इंग्रजी ऑस्कर वाइल्ड
फास अनंत काणेकर अटेन्शन फ्रेन्च डब्ल्यू.ओ. सोमिन
बंद दरवाजे (हिंदी व मराठी) इन कॅमेरा,नो एक्झिट व व्हिशस सर्कल फ्रेन्च/इंग्रजी ज्याँ पॉल सात्र
बंधुप्रेम (सुंदरराव व हंबीरराव) भास्कर पटवर्धन मिस्ट्रीज ऑफ कोर्ट ऑफ लंडन इंग्रजी रेनॉल्ड
बाकी इतिहास अरविंद देशपांडे बाकी इतिहास बंगाली बादल सरकार
बाकी सारं स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
बादशहा सदानंद रेगे एम्परर जोन्स इंग्रजी ओनील यूजीन
बेइमान वसंत कानेटकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
बेकेट(महंत) वि.वा. शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
ब्रांद सदानंद रेगे ब्रॅन्ड इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
भाग्यवान पु.ल. देशपांडे शेपी इंग्रजी सॉमरसेट मॉम
भित्रा मोगरा व्यं.ल. जोशी अंजुमल्लिगे कानडी गिरीश कर्नाड
भीमराव शिवराम महादेव परांजपे रॉबर्स इंग्रजी शिलर
मराठी शाकुंतल लक्ष्मण लेले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
महंत(बेकेट) वि.वा. शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
महाराष्ट्र शाकुंतल केशव गोडबोले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
माते, तुला काय हवंय गो.के. भट विसर्जन बंगाली रवींद्रनाथ टागोर
मारून मुटकून वैद्यबुआ ह.आ. तालचेलकर द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मारून मुटकून वैद्यबुवा ह.ना. आपटे द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मालती माधव कृष्णशास्त्री राजवाडे मालतीमाधव संस्कृत भवभूती
मालविकाग्निमित्र(संगीत) वामन जोशी मालविकाग्निमित्र संस्कृत कालिदास
मुक्तधारा किरात द वॉटर फॉल(मॉडर्न रिव्हर) इंग्रजी रवींद्रनाथ टागोर
मुक्तधारा शिवराम टेंबे मुक्तधारा बंगाली रवींद्रना्थ टागोर
मोरूची मावशी प्र.के.अत्रे चार्लीज ऑन्ट इंग्रजी ब्रॅन्डन थॉमस
ययाती श्री.रं.भिडे ययाती कानडी गिरीश कर्नाड
यक्षप्रमाद किरात मेघदूत(खंडकाव्य) संस्कृत कालिदास
रक्तबीज अरविंद देशपांडे रक्तबीज हिंदी शंकर शेष
रंगेल रंगराव दिवाकर यॉर्कशायर ट्रॅजेडी इंग्रजी थॉमस मिडलटन
रत्‍नावली(संगीत) सीताराम गुर्जर रत्नावली संस्कृत श्रीहर्ष
राईचा पर्वत ना.ह. हेळेकर द स्कू्ल फॉर स्कॅन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
राजा ईडिपस पु.ल. देशपांडे इडिपस ग्रीक सोफोक्लीस
राव जगदेवराव मार्तंड मंगेश पदकी सिरॅनो द बर्जे रॉक फ्रेन्च एदमॉं रोस्तॉं
रावबहादूर पर्वत्या ह.ना. तालचेरकर ल बुर्झ्वा जान्तिल ऑम फ्रेन्च मोलियर
रिंगण प्रवीण भोळे द कॉकेशियन चॉक सर्कल जर्मन बर्टोल्ड ब्रेख्त
लग्नसोहळा(संगीत) ल.ग. सुळे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
ल तात्युर्फ शांता वैद्य ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
लोभ नसावा ही विनंती विजय तेंडुलकर हेस्टी हर्ट इंग्रजी जॉन पॅट्रिक
वंगजागृती काशिनाथ मित्र जागरण बंगाली हरनाथ बसू
वनहंसी पा.रं. अंबिके द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वनहंसी भा.वि. वरेरकर द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वरवंचना (संगीत) गो.स.टेंबे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
वल्लभपूरची दंतकथा अमोल पालेकर वल्लभपुर बंगाली बादल सरकार
वाजे पाऊल आपुले विश्राम बेडेकर सेन्ड मीनो फ्लॉवर्स इंग्रजी कॅरॉल मूर
वाडा भवानी आईचा मानसी कणेकर द हाउस ऑफ बर्नाडा आल्बा इंग्रजी फेडरिको गार्सिया लॉर्की
वासनाचक्र विजय तेंडुलकर स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
विकत घेतला न्याय मधुकर तोरडमल द व्हिजिट इंग्रजी फ्रिडरिश ड्यूरनमॅट (?)
विक्रमोर्वशीय भास्कर ताम्हणकर विक्रमोर्वशीय संस्कृत कालिदास
विचारविलसित गोपाळ भाटे प्राइड अँड प्रेज्युडिस इंग्रजी जेन ऑस्टिन
विजय जिगीषा धुंडिराज जोशी शी स्टूप्स टु कॉंकर इंग्रजी गोल्ड स्मिथ
विमलादेवी रामचंद्र प्रधान मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
वीरवंचना (संगीत) गोविंदराव टेंबे ड्युएना इंग्रजी शेरिडन
वेटिंग फॉर गोदो अशोक शहाणे ऑन अटेन्डन्ट गोडो इंग्रजी सॅम्युअल बेकेट
वेटिंग फॉर गोदो माधुरी पुरंदरे ऑन अटेन्डन्ट गोडो इंग्रजी सॅम्युअल बेकेट
वेणीसंहार परशुराम गोडबोले वेणीसंहार संस्कृत भट्टनारायण
वैजयंती वि.वा. शिरवाडकर मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती पद्माकर गोवईकर ईच इन हिज ओन वे इटालियन लुइगी पिरॅंदेलो
शकुंतला (संगीत) हणमंत महाजनी अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल कृष्णशास्त्री राजवाडे अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल नाटक परशुराम गोडबोले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल(संगीत) अण्णासाहेब किर्लोस्कर अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल(संगीत) वासुदेव डोंगरे अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत
शापसंभ्रम(संगीत) गोविंद बल्लाळ देवल शापसंभ्रम संस्कृत बाणभट्ट
शीलसंन्यास वीर वामनराव जोशी मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
श्रुतकीर्तिचरित ह.ना. आपटे द मोर्निंग ब्राइड इंग्रजी कॉग्रेव्ह
शूर रायबा /शेवटी डाव फसला हरिश्चंद्र तालचेलकर रुचिव्हला फ्रेन्च व्हिक्टर ह्यूगो
सखाजीराव ढमाले शिवराम सीताराम वागळे द पुरसोनक फ्रेन्च मोलियर
सटवाई अथवा नटमोगऱ्याची फटफजिती ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
समजुतीचा घोटाळा अनंत बर्वे शी स्टूप्स टु कॉंकर इंग्रजी गोल्ड स्मिथ
समर्थ भिकारी (चंद्रशेखर) भा.वि. वरेरकर साइन ऑफ द क्रॉस इंग्रजी बॅरेट विल्सन
संशयकल्लोळ (संगीत) गो.ब .देवल ऑल इन द रॉंग इंग्रजी मर्फी
द साइटलेस दिवाकर द साइटलेस इंग्रजी मेटरलिंक
सारेच सज्जन व्यंकटेश वकील अ‍ॅन इन्स्पेक्टर कॉल्स इंग्रजी जे.बी. प्रीस्टले
साक्षीदार विद्याधर गोखले इंग्रजी अ‍ॅगाथा ख्रिस्ती
सुख पाहता स.गं. मालशे स्ट्रेन्ज इन्टरव्ह्यूड इंग्रजी ओनील यूजीन
सुंदर मी होणार पु.ल .देशपांडे बॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीट इंग्रजी रुडॉल्फ बेसीर
सुंदरराव व हंबीरराव (बंधुप्रेम) भास्कर पटवर्धन मिस्ट्रीज ऑफ कोर्ट ऑफ लंडन इंग्रजी रेनॉल्ड
सुंदरी (गर्वनिरसन) गोविंद काळे लेडी ऑफ लिऑन्स इंग्रजी लॉर्ड लिन्टन
सुमतिविजय ह.ना. आपटे मेझर फॉर मेझर इंग्रजी विल्यम शेक्सपियर
सुशील गृहस्थ रघुनाथ राजाध्यक्ष गुड नेचर्ड मॅन इंग्रजी गोल्ड स्मिथ
हयवदन चि.त्र्यं. खानोलकर हयवदन कानडी गिरीश कर्नाड
हिरा जो भंगला नाही मालतीबाई बेडेकर अनास्तॉंशिया फ्रेन्च मार्सेल मॉरेट
देखवेना डोळा श्रीनिवास नार्वेकर अ‍ॅन एनिमी ऑफ द पीपल इंग्रजी हेन्रिक इब्सेन


शेक्सपियरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांसाठी पहा : विल्यम शेक्सपियर

[संपादन]