Jump to content

भालचंद्र पेंढारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर
जन्म भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर
नोव्हेंबर २५, १९२१
हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
मृत्यू ऑगस्ट ११, २०१५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे अण्णा, अण्णासाहेब
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण
कारकीर्दीचा काळ १९३७ -
भाषा मराठी,
प्रमुख नाटके दुरितांचे तिमिर जावो, वगैरे
पुरस्कार विष्णूदास भावे पुरस्कार, वगैरे
वडील व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर
पत्नी मालती पेंढारकर
अपत्ये प्रसाद पेंढारकर, गिरिजा पेंढारकर-काटदरे, ज्ञानेश पेंढारकर
अधिकृत संकेतस्थळ भालचंद्र पेंढारकर डॉट कॉम

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर (जन्म : हैदराबाद, नोव्हेंबर २५, १९२१ - मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.

भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते.

ललितकलादर्श

[संपादन]

१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

भालचंद्र पेंढारकर यांची नाट्यकारकीर्द - नाटकाचे नाव आणि (भूमिका)

[संपादन]
  • अंमलदार (ढगेसाहेब)
  • आनंदी गोपाळ (दांडेकर)
  • इंद्रजितवध (सूत्रधार)
  • उद्याचा संसार (शेखर)
  • उसना नवरा (अरविंद)
  • एकच प्याला (डॉक्टर)
  • कुंजविहारी (पेंद्या)
  • कृष्णार्जुन युद्ध (नारद)
  • खरा ब्राह्मण (गावबा)
  • गड्या आपला गाव बरा (बाळाजीराव)
  • गीता गाती ज्ञानेश्वर (वासुदेव)
  • गोकुळचा चोर (महाबळ)
  • घराबाहेर (पद्मनाभ)
  • जय जय गौरीशंकर (नारद)
  • जिंजीचा वेढा (राजाराम)
  • झाला अनंत हनुमंत (कीर्तनकार)
  • तुझे आहे तुजपाशी (आचार्य)
  • तुरुंगाच्या दारात (संजीव)
  • दुरितांचे तिमिर जावो (दिगू)
  • निशिकांताची नवरी (निशिकांत)
  • पडछाया (केदार)
  • पंडितराज जगन्‍नाथ (पंडितराज)
  • पुण्यप्रभाव (वसुंधरा?)
  • फुलपाखरे (प्रसाद)
  • बावनखणी
  • भटाला दिली ओसरी (अशोक)
  • भाग्योदय
  • भावबंधन (प्रभाकर)
  • मंदारमाला (मकरंद)
  • मानापमान (विलासधर)
  • मृच्छकटिक (शर्विलक)
  • रंगात रंगला श्रीरंग (बाबूजी)
  • रक्त नको मज प्रेम हवे (शांचू)
  • लग्नाची बेडी (पराग)
  • वंदे मातरम्‌ (दिलीप)
  • वधूपरीक्षा (धुरंधर)
  • विद्याहरण (कच)
  • शापसंभ्रम (कपिंजल)
  • शाबास बिरबल, शाबास (बिरबल)
  • शारदा (कोदंड, श्रीमंत)
  • सत्तेचे गुलाम (वैकुंठ)
  • संन्यासाचा संसार (डेव्हिड)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
  • सुंदर मी होणार (कवी)
  • सोन्याचा कळस (विठूकृष्णा)
  • सौभद्र (अर्जुन, नारद)
  • स्वयंसेवक (जगन्‍नाथ)
  • स्वामिनी (जगन्‍नाथ)
  • हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
  • होनाजी बाळा (बाळा)
  • श्री (श्रीकांत)

दिग्दर्शन केलेली नाटके

[संपादन]
  • दुरितांचे तिमिर जावो
  • पंडितराज जगन्नाथ

संगीत दिग्दर्शन केलेली नाटके

[संपादन]
  • आकाशगंगा
  • आकाश पेलताना
  • दुरितांचे तिमिर जावो
  • पंडितराज जगन्नाथ
  • बहुरूपी हा खेळ असा
  • रक्त नको मज प्रेम हवे
  • सत्तेचे गुलाम
  • स्वामिनी

भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली गीते

[संपादन]
  • आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो; राग - मांड)
  • घनश्याम मुरली (नाटक - शाब्बास बिरबल शाब्बास)
  • जय जय कुंजविहारी (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - शाब्बास बिरबल शाब्बास)
  • जय जय रमारमण श्रीरंग (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - जय जय गौरीशंकर)
  • तू जपून टाक पाऊल जरा (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)
  • नयन तुझे जादुगार (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्‍नाथ)
  • मदनाची मंजिरी साजिरी (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्‍नाथ)
  • शिव-शक्तीचा अटीतटीचा (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्‍नाथ)
  • सप्‍तसूर झंकारित बोले (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रसाद सावकार; नाटक - पंडितराज जगन्‍नाथ)

भालचंद्र यांचे संगीत असलेली गीते

[संपादन]
  • आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो; राग - [[राग मांड|मांड)
  • तू जपून टाक पाऊल जरा (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]