राग मांड
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मांड हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक गुलाम मोहम्मद यांचा हा आवडता राग होता.
या रागाला सर्व स्वर 'शुद्ध' लागतात. हा राग दिवसाच्या कोणत्याही वेळी गाता येतो. 'सा' हा मांड रागाचा वादी व 'म' हा संवादी स्वर आहे. पण काही गायक 'पंचम'ला संवादी स्वर मानतात. तसेच काही गायक कधीकधी कोमल ‘नी’ लावतात. याच कारणाने, मांड रागाचे दोनदोन आरोह-अवरोह प्रचलित आहेत. ते आरोह-अवरोह असे :- (सां=वरचा सा)
१. आरोह- सा, ग, रे, म, ग, प, म, ध, प, नी, ध, सां
अवरोह- सां, ध, नी, प, ध, म, प, ग, रे, ग, सा.
२. आरोह- सा रे म प ध सां
अवरोह- सांनी ध प, प ग रे, सा रे गा, सा
मांड रागाचे मुख्य स्वर- धनी प, ध म, प ग रे, सा रे ग सा.
मांड रागातील गीते
[संपादन]- अब तो है तुमसे हर खुशी अपनी (गीतकार - : संगीतकार - सचिनदेव बर्मन: गायिका - लता मंगेशकर; हिंदी चित्रपट - अभिमान)
- आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)
- आओ गोरी आओ श्याम (चित्र
- केसरिया बलमा (हिंदी चित्रपट : लेकिन; संगीत - हृदयनाथ मंगेशकर; गायिका - लता मंगेशकर)
- चाँदनी रात बड़ी देर के बाद आई है, यह मुलाकात बड़ी देर के बाद आई है...... ठाडे रहियो, ओ बाँके यार, रे ठाडे रहियो (हिंदी चित्रपट - पाकी़ज़ा, गीतकार - मजरूह सुलतानपुरी; संगीतकार - गुलाम मोहम्मद, गायिका - लता मंगेशकर; राग - मांड+खमाज)
- जो मैं जानती , बिसरत हैं सैंया (हिंदी चित्रपट - शवाब (Shabab); गीतकार - शकील बदायुनी; संगीत - नौशाद; गायिका - लता मंगेशकर)
- तू चंदा मैं चाँदनी (हिंदी चित्रपट - रेशमा और शेरा; गीतकार - बालकवी बैरागी; संगीत - जयदेव; गायिका - लता मंगेशकर)
- देख लिया मैंने किस्मत का तमाशा (हिंदी चित्रपट - दीदार (१९५१); गीतकार - शकील बदायुनी; संगीतकार नौशाद; गायिका - लता मंगेशकर, मोहम्मद रफी)
- पधारो म्हारे देस (राजस्थानी लोकगीत)
- बचपन की मुहब्बत को..(हिंदी चित्रपट - बैजू बावरा; संगीतकार नौशाद; गायिका - लता मंगेशकर)
- मैं ये सोच कर उसके दर से उठा था (हिंदी चित्रपट - हक़ीक़त; गीतकार - कैफ़ी आज़मी; संगीतकार - मदन मोहन; गायक - मोहम्मद रफी)