Jump to content

बुराई नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुराई नदी ही महाराष्ट्राच्या तापी खोरे मधील तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. बुराई नदी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर आणि धुळे जिल्ह्याच्या साक्रीशिंदखेडा या तालुक्यांतून वाहते. नदीचा मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. नदीचा उगम नवापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या कोंडाईबारी येथे होतो. बुराई नदी पुढे सुलवाडे येथे तापी नदीला मिळते. नदीवर साक्री तालुक्यात आखाडे येथे व शिंदखेडा तालुक्यात वाडी शेवाडे या ठिकाणी धरण बांधण्यात आले आहे. पान नदी, शेवरी नदी, रोडी नदी या बुराई नदीच्या उपनद्या आहेत.

बुराई नदीवर ३४ बंधारे बांधून तिला बारमाही प्रवाहित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार आहेत. (एप्रिल २०१८ मधील बातमी).