Jump to content

तीसरी कसम (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तीसरी कसम
दिग्दर्शन बासू भट्टाचार्य
निर्मिती शैलेंद्र
प्रमुख कलाकार राज कपूर
वहिदा रेहमान
संगीत शंकर जयकिशन
भाषा हिंदी
प्रदर्शित १९६०
अवधी १५९ मि.


हिंदी लेखक फणीश्वर नाथ रेणु यांच्या 'मारे गए गुलफ़ाम' कथेवर आधारीत, इ.स.१९६०मध्ये बासू भट्टाचार्य दिग्दर्शित तीसरी कसम हा हिंदी चित्रपट आहे. राज कपूर आणि वहिदा रेहमान मुख्य भूमीकेत असून शंकर जयकिशन यांनी चित्रपटास संगीत दिले आहे.

मूळ कथा "मारे गए गुलफ़ाम"

[संपादन]

वीस वर्षांपासून बैलगाड़ी हाकण्याचा व्यवसाय करणारा हिरामण एक हुशारपण अविवाहीत बैलगाडीवान असतो.एकदा एका मेळ्यात एक स्त्री प्रवासी त्याच्या बैलगाडीत बसते. साध्या सरळमार्गी हिरामण आणि स्त्री प्रवासी हिराबाई प्रवासा दरम्यान एकमेकांना भावतात, तरी पण नौटंकी कंपनीत काम करणारी हिराबाई हिरामणच्या जीवनात येऊ शकत नाही.

एका उपकथानकात आई स्वर्गवासी झालेली छोटी महुआ नावाची मुलगी, सावत्र आईकडून एका सौदागारास विकली जाते.तेव्हा डोळ्यात पाणी आणून स्वर्गवासी आईला विचारते ओ मॉं! श्रावण-भाद्रपदातली दुथडी भरून वाहणारी नदी, भयावह रात्र, विजा कडाडताहेत,मी बिचारी-कुवारी नन्ही मुलगी, माझ काळीज भितीनं काळीज धडकतय.एकली कशी जाऊ घाटावर? सो भी परदेशी राही-बटोही के पैर में तेल वाटलेने के लिए! सावत्र आईनी आपले बज्जर-कवाड़ बंद केलेना.आसमंतात केवढा मेघांचा गडगडाट होतोय आणि केवढी मुसळधार पावसाची झड लागली आहे.आपल्या आईची याद येऊन, महुआला रडू कोसळत.आज तिची सख्खी आई असती तर अशा भितीदायक रात्री आपल्या काळजाच्या तुकड्याला घट्ट बिलगवून ठेवल असतं.आपल्या महुआ बेटीला 'हे मैय्या हाच दिवस दाखवण्याकरता तू मला तूझ्या पोटात वाढवलंस? महुआ आपल्या आई वर रागावली- का ती एकटी मेली, पोट भरून दोष देत आईला या लोक गितात महुआ म्हणते:

'हे अ-अ-अ- सावना-भादवा के, र- उमड़ल नदिया, में,मैं-यो-ओ-ओ,
मैयो गे रैनि भयावनि-हो-ए-ए-ए;
तड़का-तड़के धड़के करेज-आ-आ मोरा
कि हमहूॅं जे बार-नान्ही रे-ए-ए.

लोकगिताच मराठी स्वैर रूपांतरण

हेSSSS श्रावंणी-भादंरपदी, उमडली नदी गे,माSयोSSS
मायोSSS रात्र भयाणही की-होS-ए-ए-ए;
तड़प-तड़पे धड़कतेना काळीजं-आ-ए माझेS
कि मीहो तुजे बाळ-लहानग्ही रेSऱ्हे-ए.

हूॅं-ऊॅं-ऊॅं-रे डाइनियॉं मैयो मोरी-ई-ई,
नोनवा चटाई काहे नाही मारलि सौरी-घर-अ-अ.
एहि दिनवॉं खातिर छिनरो धिया
तेंहु पोसलि कि तेनू-दूध उगटन.

लोकगिताच मराठी स्वैर रूपांतरण
हूॅं-ऊॅं-ऊॅं-रे डायनियॉं गे मैय्यो माझे मा-ई-ई,
खारे चाटविशी काहे नाही मारिलि दारी-घर-अ-अ.
याची दिवस दावण्यासाठी का सोडून गेलीसे
कसले कुठे पोषण-रक्षण कुठे? हरवले तुझे-दूध गुटी उगटन.

सौदागर महुआची वेणी पकडून खेचत नावेवर नेतो.रात्र-भर महुआ रडणाऱ्या महूआला मार्ग सूचतो महुआ छपाक म्हणून पाण्यात उडी घेते. सौदागरचा एक नौकर महुआला पाहूनच मोहित झाला होता. महुआच्या पाठोपाठ तोही उडी घेतो. भाद्रपदातल्या भरल्या नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहा विरूद्धा पोहत. महुआ मार्ग काढते सौदागराचा नौकर मात्र तिची आयूष्यभर सोबत करण्याचे वचन देत असतो हिरामणच हे आवडत लोकगीत हिराबाईला प्रवासा दरम्यान तो म्हणून दाखवतो, तो स्वतची सौदागराच्या नौकराच्या जागी कल्पना करत असतो.मुख्य कथानकातील पात्रांची महुआच्या उपकथानकाशी अप्रत्यक्ष अल्पशी तुलना कथाकार फणीश्वर नाथ रेणु करतात.[ संदर्भ हवा ]