Jump to content

ओकारान्त नावांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आडनावांमध्ये आर्नाल्डो, ऑगस्टिनो, ॲंतोनियो सारखी नावे मुळात आर्नोल्ड, ऑगस्तिनी किंवा ॲन्टनी सारख्या नावांची बदलेलेली रूपे असतात. पौर्वात्य नावांमध्ये सुकार्नो(मूळ सुकर्ण), सुहार्तो(मूळ सुहृद्) ही अशीच नावे. जपानमध्ये टोजो, अकाहितो, हिरोहिटो अशी बरीच आडनावे आहेत. त्यामानाने ओकारान्त मराठी आडनावे फारच थोडी आहेत. उदा० तोरो, टोंगो, कानगो, कानुंगो(ओरिसा) आणि मंटो (पंजाबी मुसलमान) वगैरे.

असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा एकेरी वा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत, जी किंवा बा जोडणेच प्रशस्त समजले जाई. हा पंत, जी आणि बा बहुधा त्या नावांचा अतूट हिस्सा बनलेला असे. हल्लीच्या काळात अशा नावाची माणसे आढळून येत नाहीत.

अशी काही नावे :- एको, कान्हो, केरो, कोंडो, खंडो, खेळो, गंगो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, तुको, दत्तो, दादो, दासो, धोंडो, नागो, नारो, निळो, परसो, बंडो, बाळको, मोरो, रंगो, राघो, विठो, विनो, व्यंको, सालो मालो, सोनो इत्यादी.

नावात ओकारान्त शब्द असलेल्या काही प्रसिद्ध मराठी व्यक्ती
  • अण्णाजी दत्तो : शिवाजीचे वाकनीस, नंतर सुरनीस आणि शेवटी अमात्य
  • अण्णो दत्ताजी चित्रे : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण (१२८० किलो) वजनाचे सोन्याचे राजसिंहासन करणारे सोनार.
  • आनंदीबाई धोंडो कर्वे (१८६४-१९५०) : महर्षी कर्वांच्या पत्‍नी. त्यांनी माझे पुराण या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.
  • एकोजी भोंसले : शिवाजीचा सावत्र भाऊ
  • कान्होजी आंग्रे : शिवाजीच्या नौदलातले सरखेल
  • कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी.
  • कान्हो पाठक (इ.स.१८९०) एक ज्ञानेश्वरकालीन कवी
  • कान्होपात्रा (इ.स.१४६८) : एक संत कवयित्री
  • कान्होबा (१७वे शतक) : तुकारामाचा धाकटा भाऊ. तुक्याबंधू या नावाने याने अभंग रचले आहेत.
  • कान्होबा : श्रीकृष्णाचे एक नाव.
  • केरो : प्राचार्य केरो लक्ष्मण छत्रे (१८२४-१८८४) हे ज्योतिषविषयक आणि सृष्टिविषयक ग्रंथांचे लेखक होते.
  • खंडो कृष्ण गर्दे (१८४८-१९२४) हे कानडी व मराठी भाषेतील एक विद्वान लेखक आणि कवी होते.
  • खंडो चिमणाजी : पेशवाईतील एक वीर
  • खंडो बल्लाळ : हा मराठ्यांचा स्वामिभक्त चिटणीस होता.
  • खेळोजी भोसले : विठोजीचा पुत्र.
  • गंगोजी नाईक (राणे) (१८व्या शतकाचा पूर्वार्ध) : अणजूर(तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे) येथील धार्मिक प्रवृत्तीचे सरदार.
  • गंगोबा तात्या चंद्रचूड : पेशव्यांचे कारभारी. यांचा निमगाव येथे भीमातीरी भव्य आणि प्रेक्षणीय वाडा आहे.
  • गुंडो दासो कंपली : हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. आयुष्यातील उत्तरार्धात ते पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा या संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते.
  • गोरोबा (गोरा कुंभार) (१२६७-१३१७) :
  • चिंतो कृष्ण वळे (१८व्या शतकाचा उत्तरार्ध) : भाऊसाहेबांची बखर या सुप्रसिद्ध बखरीचे एक सहलेखक.
  • चिंतो विठ्ठल : सवाई माधवराव पेशव्यांविरुद्ध जाऊन राघोबादादाला मिळालेला एक फितूर. बारभाईंनी याला कैदेत टाकले होते.
  • चिंतो विश्वनाथ : १८६७साली प्रसिद्ध झालेल्या सर्वेपरिज्ञान नामक ११२२ पानी ग्रंथाचे विद्वान लेखक. हा ग्रंथ मुंबईच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने छापून प्रकाशित केला होता.
  • चोखोबा ऊर्फ चोखामेळा (मृत्यू १३३८). एक संतकवी.
  • तानोजी आंग्रे : कान्होजी आंग्रेंचे वडील
  • तुकोजी होळकर : इंदूरचे सरदार, बारभाईंपैकी एक.
  • दत्तो कोंडो घाटे (१८७५-१८९९) : दत्त या टोपणनावाने कविता करणारे मराठीतील एक कवीदत्तो कोंडो घाटे ऊर्फ दत्तकवी वि.द. घाटे यांचे वडील आणि अनुराधा पोतदार यांचे पितामह
  • दत्तो वामन पोतदार
  • दादोजी कोंडदेव
  • दासो दिगंबर देशपांडे (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक.
  • दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक.
  • दिनकर धोंडो कर्वे : हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते.
  • धोंडो केशव कर्वे :
  • धोंडो राघो पुजारी : संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीदरम्यान फ्लोरा फाउंटनला गोळीबारात मरण पावलेला हुतात्मा.
  • धोंडो विष्णू आपटे : सावंतवाडीच्या छत्रपतींचे तोतये वकील
  • रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) : भारतातील संततिनियमनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, संपादक आणि लेखक.
  • सदाशिव धोंडो : बारभाईंनी यांना कैदेत टाकले होते.
  • नागोजी भोसले : विठोजीचा पुत्र.
  • नारायण दासो बनहट्टी (१८६२-१९४७) : यांनी व्याकरण, संगीत यांवर ग्रंथलेखन आणि निबंधलेखन केले आहे. मराठी लेखक श्री.ना.बनहट्टी यांचे वडील.
  • नारो अप्पाजी तुळशीबागवाले
  • नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठी शाहीर
  • नारो भिकाजी (रत्‍न?)पारखी ऊर्फ मौनीस्वामी ऊर्फ नारायणेंद्र सरस्वती ऊर्फ मौनीनाथ (१७८४-१८७६): अध्यात्म आणि वेदान्तावर लिहिणारे लेखक-कवी.
  • नारो मुजुमदार : जिजाबाईच्या हाताखालचे पुण्याच्या जहागिरीतले एक कारभारी.
  • नारोशंकर : आधी इंदूरचे सुभेदार आणि नंतर पेशव्यांचे सरदार. यांनी बांधलेला मालेगावचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे, तशीच नाशिकची नारोशंकराची घंटा
  • नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार.
  • नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत.
  • निळोबा : एक संतकवी. पूर्ण नाव निळोबा मुकुंद पिंपळनेरकर. - इ.स.१७५३. हे तुकारामाचे शिष्य होते.
  • परसोजी भोसले : विठोजींचा पुत्र.
  • बाळकोबा भावे : विनोबा भाव्यांचे बंधू
  • नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी.
  • मालोजी घोरपडे : सवाई माधवराव पेशव्यांच्या वतीने राज्याचा कारभार पहाणाऱ्या बारभाईंपैकी एक.
  • मालोजी भोसले : शिवाजीचे आजोबा; शिवाजीचे चुलत काका(विठोजींचे पुत्र)
  • मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०) : मराठीतील एक कवी, नाटककार व निबंधलेखक.
  • मोरो त्र्यंबक पिंगळे (१७वे शतक) : शिवाजीच्या राज्याचे पहिले पंतप्रधान
  • मोरोजी नाईक : सवाई माधवराव पेशव्यांविरुद्ध जाऊन राघोबादादाला मिळालेला एक फितूर. बारभाईंनी याला कैदेत टाकले होते.
  • मोरोपंत तथा मोरेश्वर रामचंद्र पराडकर (१७२९-१७९४) :
  • मोरोपंत विठ्ठल वाळवेकर : जोतिबा फुलेंचे मित्र; गृहिणी मासिक आणि सुबोध पत्रिकेचे संपादक; छापखानदार; स्वतंत्र लेखक, भाषांतरकार आणि ग्रंथ प्रकाशक.
  • मोरोबा कान्होबा विजयकर (१८१३-१८७१) : ऐतिहासिक कथांचे लेखक. रावबहादुर मोरोबा कान्होबांचे घाशीराम कोतवाल नावाचे आगळेवेगळे पुस्तक १८६३साली प्रसिद्ध झाले होते.
  • मोरोपंत तांबे : झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे वडील.
  • मोरोपंत पेशवे : मोरो त्र्य़ंबक पिंगळे (शिवाजीच्या राज्याचे पहिले पंतप्रधान)
  • मोरोबा फडणीस : सवाई माधवराव पेशव्यांच्या वतीने राज्याचा कारभार पहाणाऱ्या बारभाईंपैकी एक. पुढे फितुरीमुळे यांना तुरुंगात टाकले गेले.
  • रंगो बापूजी (मृत्यू १८८५): साताऱ्याच्या छत्रपतींचे कारभारी आणि वकील. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाणे शहरातील एका चौकाला रंगो बापूजी गुप्ते चौक असे नाव दिले आहे. प्रबोधन ठाकऱ्यांनी यांचे चरित्र लिहिले आहे. यांनी साताऱ्याच्या शिवाजीचे वकीलपत्र घेऊन लंडनला प्रिव्ही काउन्सिलमध्ये केस लढवली होती.
  • रंगो लक्ष्मण मेढे (१८व्या शतकाची अखेर आणि १९व्याची पहिली वीस-पंचवीस वर्षे) : एक बखरकार
  • गोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार : मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त.
  • धोंडो राघो पुजारी : संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीदरम्यान फ्लोरा फाउंटनला गोळीबारात मरण पावलेला हुतात्मा.
  • रंगो बापूजी धडफळे : इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या.
  • राघो धौशा : महानुभाव शाहीर.
  • राघोनंदन : पदकार.
  • राघो पंडित (इ.स.१३१२) : महानुभाव कवी
  • राघोबा : समर्थ रामदासांचे एक टोपण नाव
  • राघो भरारी ऊर्फ राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव पेशवे :
  • विठोजी भोसले : मालोजी भोसल्यांचे भाऊ
  • विनोबा भावे :
  • व्यंकोजी भोसले : शिवाजीचा सावत्र भाऊ
  • शंकर मोरो रानडे (१८५०-१९०३) : नाटककार व ग्रंथकार; नाट्यकथार्णव , इंदुप्रकाश आणि नेटिव्ह ओपिनियन या नियतकालिकांचे संपादक. समाजसुधारक.
  • शरीफजी किंवा सरफोजी भोसले : शहाजीचा भाऊ
  • शिवाजी कान्हो : सवाई माधवराव पेशव्यांविरुद्ध जाऊन राघोबादादाला मिळालेला एक फितूर. बारभाईंनी याला कैदेत टाकले होते.
  • सदाशिव खंडो आळतेकर (श्रीसमर्थचरित्र या ग्रंथाचे -शके १८५५-लेखक)
  • सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार
  • सोनोजीपंत : जिजाबाईच्या हाताखालचे पुण्याच्या जहागिरीतले एक कारभारी.
  • सोनोपंत दांडेकर (१८९६-१९६८) :


पहा : याकारान्त आडनावे; आडनावे (भारतीय)