अनुराधा पोतदार
Appearance
कै. डॉ. अनुराधा पोतदार (जन्म : १५ डिसेंबर, १९२७; - ३ ऑक्टोबर, २०१३) या मराठीतील एक कवयित्री होत्या.. या वि.द. घाटे यांच्या पुत्री तर दत्त (कवी) यांची नात होत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि मुलगी यशोधरा पोतदार-साठे हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल्या आजोबांचे चरित्र लिहिले आहे. कवितेसोबत अनुराधाबाई ललितलेखन, कथा-कविता संपादन, प्रस्तावना, वैचारिक लेखन, समीक्षा यांतही अधिक रमल्या.
अनुराधा पोतदार यांनी मराठीचा अर्थविचार विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. केली आहे आणि त्या इ.स. १९८३पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत होत्या. त्यांनी एकूण ६ पुस्तकांचे संपादन केले आहे.
अनुराधा पोतदार यांची पुस्तके
[संपादन]- आवर्त (कवितासंग्रह)
- कॅक्टस फ्लॉवर (कवितासंग्रह)
- कांचनाची निरांजने (पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथांचे संपादन)
- कुसुमावती (कुसुमावती देशपांडे यांच्या कवितांचे संपादन)
- तुकाराम : कथात्म साहित्य : एक अभ्यास
- दत्तकवी (काव्य आणि जीवन-चरित्र)
- पद्पत्र संजीवनी (संजीवनी मराठे यांच्या निवडक कवितांचे संपादन)
- मंझधार (कवितासंग्रह)
- मराठीचा अर्थविचार (प्रबंध आणि पुस्तक)
- महान स्त्रिया
- मृगधारा (वि. म. कुलकर्णी यांच्या निवडक कवितांचे संपादन)
- बालविहंग (बालकवींच्या कवितांचे संपादन)
- ’रणांगण’ कादंबरीची समीक्षा (लेख)
- रविकिरण मंडळाची निवडक कविता (वसंत कानेटकर यांच्या बरोबर संपादित)
- सहकंप
अनुराधा पोतदार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- अनंत काणेकर पुरस्कार
- कुसुमाग्रज पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
- शि.म. परांजपे पुरस्कार