आदर्श शिंदे
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
आदर्श शिंदे | |
---|---|
जाफ्राबादमधील 'आदर्श शिंदे नाईट्स' या भीमगीतांच्या कार्यक्रमात आदर्श शिंदे, १० एप्रिल २०१८. | |
आयुष्य | |
जन्म | ७ मार्च १९८८ |
जन्म स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | बौद्ध |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | विजया शिंदे |
वडील | आनंद शिंदे |
जोडीदार | नेहा लेले-शिंदे |
अपत्ये | अंतरा शिंदे |
नातेवाईक | प्रल्हाद शिंदे (आजोबा) मिलिंद शिंदे (काका) उत्कर्ष शिंदे (भाऊ) हर्षद शिंदे (भाऊ) |
संगीत साधना | |
गुरू | आनंद शिंदे |
गायन प्रकार | लोक गायन, भीमगीत व इतर |
घराणे | शिंदे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
आदर्श आनंद शिंदे (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत. हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत.सर्वात जास्त गीते रेकॉर्ड करण्यासाठी त्यांची आणि शिंदेशाहीची गिनीज बुक मध्ये नोंदणी आहे. ते प्रसिद्ध गायक स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे यांचे नातू आणि आनंद शिंदे यांचे सुपुत्र आहेत.वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाची सुरुवात करणारे आदर्श शिंदे सध्या मराठी संगित क्षेत्रातील आघाडीचे गायक आहेत.तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतही कार्यरत आहेत.
वैयक्तिक जीवन
[संपादन]आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत.
आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहे.
आदर्श शिंदेंनी २७ मे २०१५ रोजी नेहा लेले सोबत मुंबईत बौद्ध पद्धतीने विवाह केला.[१]
कारकीर्द
[संपादन]आदर्श शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले.
सन २०१४ मध्ये 'शिंदे' कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती.
आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५००हून अधिक गाणी गायली आहेत.
पुरस्कार
[संपादन]आदर्श शिंदे यांना मिळालेले पुरस्कार
- दादासाहेब फाळके पुरस्कार – दुनियादारी या चित्रपटातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ या गाण्यासाठी
- मराठी मिर्ची संगीत पुरस्कार - ‘रेडियो मिर्ची’कडून
- गायक ऑफ द ईयर पुरस्कार – ‘स्टार प्रवाह’कडून
- झी युवा सन्मान पुरस्कार २०१७
- संस्कृती कलादर्पन २०१७ आवाज वाढव डीजे
- फिल्मफेअर २०१८ -विठ्ठला(रिंगण)
- टाईम्स मराठी फिल्म आयकॉन २०१९ तरुणाईचा आवाज
- फिल्मफेअर २०२० तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
- महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२० तुला जपणार आहे
- मज्जा डिजिटल अवॉर्ड २०२० आऊटस्टॅंडिंग म्युझिक तुला जपणार आहे
- फिल्मफेअर २०२१ धुरळा
- सांस्कृतिक कलादर्पन २०२२ टकाव टकाव जिंदगी (घोडा)
- रेडिओ मिरची म्युझिक २०२२ अल्बम ऑफ द इअर - धुरळा
- फक्त मराठी सिने सन्मान २०२२ - अष्टमी (धर्मवीर)
- झी टॉकीज कॉमेडी सर्वोत्कृष्ट गायक २०२२ - दादा परत या ना (पांडू)
- महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२२ - अष्टमी (धर्मवीर)
- फक्त मराठी सिने सन्मान २०२३ -ऐक रंभा एक राव (राव रंभा)
- लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला प्रबोधन पुरस्कार २०२३