आत्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते. कठोपनिषदात म्हटले आहे,

आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु।

बुद्धिं तु सारथी विद्धि, मन प्रग्रहमेवच॥

आपले शरीर म्हणजे रथ आहे, याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन आणि सारथी आहे बुद्धी. या रथाचा स्वामी कोण? तर तो आपला आत्मा होय.

आत्म्याच्या गुणांबद्दल गीतेमध्ये विस्ताराने माहिती आहे.

आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती व वर्णन[संपादन]

[१]

  • अविनाशी
  • मरत नाही
  • मारत नाही
  • शाश्वत
  • पुरातन
  • शरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही
  • अजन्मा
  • अव्ययी
  • न कापता येण्याजोगा
  • न जळणारा
  • न भिजणारा
  • न सुकणारा
  • अचल
  • सनातन
  • अव्यक्त
  • इंद्रियांना अगोचर
  • अचिन्त्य
  • अविकारी

आत्मा अविनाशी अमर आहेच पण त्यास जन्ममरण नाही तसाच तो सर्वव्यापी आहे. सर्वत्र समसमान भरलेला आहे. तो कोठेही जातयेत नाही. त्यामुळे आत्मा देह सोडून जातो ही चुकीचे आहे. आत्मा आहे तसाच अखंड आहे. त्या देहातून फक्त चैतन्य/जाणीव निघून जाते. संदर्भ[संपादन]

  • कठोपनिषद. १.४.९.)

<ज्ञानेश्वरी/>

  1. ^ अध्याय २ श्लोक १७ ते २६