अग्नी (देवता)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अग्नी | |
अग्नीदेव अग्नी (आग) - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | अग्नीदेव |
संस्कृत | अग्नी |
निवासस्थान | अग्नीलोक |
वाहन | मेष(मेंढा) |
शस्त्र | भाला |
वडील | कश्यप |
आई | आदिती |
पत्नी | स्वाहा,स्वधा / सुदर्शना |
अपत्ये | आग्नेय (मुलगी) |
मंत्र | ॐ नमो अग्नीदेवाय
ॐ महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नीः प्रचोदयात |
नामोल्लेख | ऋग्वेद |
अग्नी हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे[१]ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.[२] तो तरुण आहे व सदैव तरुणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नवीन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुण व इंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वी व स्वर्ग यामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.
जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् | नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्निः इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४
सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत.विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप होय.
संदर्भ- संस्क्रुति कोष
संदर्भ
[संपादन]संस्क्रुति कोष
- ^ Cavendish, Richard (1998). Mythology, An Illustrated Encyclopedia of the Principal Myths and Religions of the World. ISBN 1-84056-070-3
- ^ January 19, 2013 (2013-01-19). "Agni - The Messenger God". 2013-08-09 रोजी पाहिले.