Jump to content

अग्नी (देवता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नी

अग्नीदेव

अग्नी (आग) - इत्यादींची अधिपती देवता

मराठी अग्नीदेव
संस्कृत अग्नी
निवासस्थान अग्नीलोक
वाहन मेष(मेंढा)
शस्त्र भाला
वडील कश्यप
आई आदिती
पत्नी स्वाहा,स्वधा / सुदर्शना
अपत्ये आग्नेय (मुलगी)
मंत्र ॐ नमो अग्नीदेवाय

ॐ महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नीः प्रचोदयात

नामोल्लेख ऋग्वेद

अग्नी हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे[]ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.[] तो तरुण आहे व सदैव तरुणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नवीन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.

या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुणइंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वीस्वर्ग यामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.

जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् | नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्निः इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४

सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत.विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप होय.



संदर्भ- संस्क्रुति कोष

संदर्भ

[संपादन]

संस्क्रुति कोष

  1. ^ Cavendish, Richard (1998). Mythology, An Illustrated Encyclopedia of the Principal Myths and Religions of the World. ISBN 1-84056-070-3
  2. ^ January 19, 2013 (2013-01-19). "Agni - The Messenger God". 2013-08-09 रोजी पाहिले.