Jump to content

९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (ठाणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, ठाणे या पानावरून पुनर्निर्देशित)


९६वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे शहरात १९ ते २१ फेब्रुवारी, २०१६ या कालावधीत होईल.

यात संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या चित्रांगदा या नाटकासह सुमारे पंधरा नाटके तसेच बारा एकांकिका दाखवल्या जातील..

नाट्य संमेलनाच्या आठ दिवस आधी संमेलनपूर्व संमेलन घेण्यात येणार आहे. त्यात वेगवेगळ्या कला व कलाकारांचा आविष्कार होईल.

मुख्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची मुलाखत, नाट्य-शाखांचे विविध कार्यक्रम, स्पर्धेतील विजेत्या एकांकिका, दोन बालनाट्ये, एक संगीत नाटक, सात व्यावसायिक नाटके, दोन लोकनाट्ये, महिला कलावंतांच्या दोन नाटिका, ५० कलाकारांचे एकपात्री कार्यक्रम, कलावंत रजनी, असे कार्यक्रम असतील. गेले तरुण प्रेक्षक कुणीकडे या विषयासह नाट्य व्यवसायाची इंडस्ट्री कशी होणार, अशा विविध विषयांवर नाट्य संमेलनात चर्चा होईल. राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांची नाट्य संगीत मैफल, सुबोध भावे आणि महेश काळे यांची सूर निरागस हो तर शौनक अभिषेकी आणि मंजूषा पाटील यांची तीर्थ विठ्ठल ह्या मैफिली होणार आहेत. संमेलनाचे उद्‌घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी होणार आहे. त्यानंतर नंदेश उमप यांचे शिवसोहळा हे महानाट्य सादर होईल.