२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका
Appearance
२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका या २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षातील अंतर्गत निवडणूका आहेत. या निवडणूका २ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होतील.
प्रत्येक राजकीय पक्ष राज्यनिहाय निवडणूका घेउन त्यांतील कौलानुसार राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीसाठी आपला उमेदवार ठरवेल. या निवडणूका संपल्यावर प्रत्येक पक्ष अधिवेशन भरवेल व त्यात अधिकृतपणे उमेदवारांची नावे जाहीर होईल.
प्रमुख पक्षांच्या निवडणूका व अधिवेशने याप्रमाणे असतील -
पक्ष | प्राथमिक निवडणूक | अधिवेशन | राष्ट्राध्यक्ष उमेदवार | उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार |
---|---|---|---|---|
रिपब्लिकन पक्ष | निवडणूक | अधिवेशन | डॉनल्ड ट्रंप | माइक पेन्स |
डेमॉक्रॅटिक पक्ष | निवडणूक | अधिवेशन | हिलरी क्लिंटन | टिम केन |
लिबर्टारियन पक्ष | निवडणूक | अधिवेशन | ठरायचे आहे | ठरायचे आहे |
ग्रीन पक्ष | निवडणूक | अधिवेशन | ठरायचे आहे | ठरायचे आहे |