२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१६ डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्रीय अधिवेशन (2016 Democratic National Convention) हे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ दरम्यान पेन्सिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फिया शहरात भरवले गेले. ह्या अधिवेशनामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी (delegates) २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटनच्या नामांकनावर शिक्कामोर्तब केले. क्लिंटनने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवडलेल्या टिम केन ह्याच्या उमेदवारीलादेखील ह्या कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली.

पक्षाच्या एकूण ४,७६३ पैकी बव्हंशी प्रतिनिधींना प्राथमिक निवडणुकींत विजय मिळवलेल्या उमेदवाराला मत देणे बंधनकारक होते. क्लिंटनने प्राथमिक निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यामुळे तिच्या नावावर शिक्कामोर्तब ही केवळ औपचारिकता होती.

ह्या अधिवेशनाला अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रथम महिला मिशेल ओबामा तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरन इत्यादी उपस्थित होते.

बाह्य दुवे[संपादन]