Jump to content

२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१६ रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अधिवेशन (2016 Republican National Convention) हे अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ दरम्यान ओहायोच्या क्लीव्हलंड शहरात भरवले गेले. ह्या अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी (delegates) २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डॉनल्ड ट्रंपच्या नामांकनावर शिक्कामोर्तब केले. ट्रंपने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवडलेल्या माइक पेन्स ह्याच्या उमेदवारीलादेखील ह्या कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली.

पक्षाच्या एकूण २,४७२ पैकी बव्हंशी प्रतिनिधींना प्राथमिक निवडणुकींत विजय मिळवलेल्या उमेदवाराला मत देणे बंधनकारक होते. ट्रंपने प्राथमिक निवडणुकीमध्ये सपशेल विजय मिळवल्यामुळे त्याच्या नावावर शिक्कामोर्तब ही केवळ औपचारिकता होती.

ट्रंपची उमेदवारी अमान्य असल्याच्या कारणावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशजॉर्ज डब्ल्यू. बुश तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते जॉन मॅककेन, मिट रॉम्नी ह्यांनी अधिवेशनास उपस्थित राहणे टाळले.

बाह्य दुवे[संपादन]