२०१० क्युबा विमान दुर्घटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१० क्युबा विमान दुर्घटना
दुर्घटनाग्रस्त विमानासारखेच दुसरे एक विमान.
अपघात सारांश
तारीख नोव्हेंबर ४, २०१०
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ
21°44′39″N 79°28′16″W / 21.744194°N 79.470978°W / 21.744194; -79.470978
प्रवासी ६१
कर्मचारी
जखमी
मृत्यू ६८ (सगळे)
बचावले
विमान प्रकार ए.टी.आर. ७२-२१२
वाहतूक कंपनी एरो कॅरिबियन
विमानाचा शेपूटक्रमांक सी.यु.-टी१५४९
पासून तूसैं लूव्हर्चर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट औ प्रिन्स, हैती
शेवट होजे मार्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हवाना, क्युबा

एरो कॅरिबियन फ्लाइट ८८३ हे एरो कॅरिबीयन या विमानसेवेचे विमान नोव्हेंबर ४ इ.स. २०१० रोजी दुर्घटनाग्रस्त होउन त्यातील सर्व, ६१ प्रवासी व चालकदलाचे ७ सदस्य यांचा मृत्यू झाला. ही हैती येथील पोर्ट औ प्रिन्स ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाणारी नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा होती.उड्डाणादरम्यान एटीआर-७२-२१२ प्रकारचे हे विमान सेंट्रल क्युबन प्रॉव्हींस क्युबा मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानात असणारे सर्व,७ चालकदल सदस्यासहीत ६१ प्रवासी ठार झालेत.एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसर्‍या क्रमाचा वाईट अपघात आहे.

विमान[संपादन]

सीयु-टी१५४९ म्हणुन नोंदविलेले एटीआर-७२ जातीचे हे विमान[१] एरो कॅरिबियनमध्ये ऑक्टोबर २००६पासुन कार्यरत होते.[२] हे विमान 'कॉन्टीनेन्टल एक्सप्रेस'या विमानकंपनीने १९९५मध्ये विकत घेतले होते. एरो कॅरिबीयन ही विमानसेवा कंपनी त्यास २००६ मध्ये विकत घेणारी त्याची तिसरी मालक होती.[२]. उत्पादकानुसार या विमानाने सुमारे २५,००० विमानोड्डाणतासात ३४,५०० उड्डाणे केली होती.[१] एरो कॅरिबीयन क्युबाच्या सरकारच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे.[३]

अपघात[संपादन]

हे विमान हैती येथील पोर्ट औ प्रिन्स[४] येथुन निघाले. ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाण्यासाठी दुपारी सुमारे ४:५०ला (स्थानिक वेळ)(20:50-आंतरराष्ट्रीय वेळ).[५] ला निघाले.'हरिकेन टॉमस' या नावाच्या वादळाच्या येण्याच्या संभाव्य सुचनेमुळे बंद करण्यापूर्वी,सेंटियागो डि क्युबा येथील विमानतळावरुन निघणारे, त्यादिवशीचे ते शेवटचे विमान होते.[६]

अपघातापूर्वी आणीबाणीचा संदेश देउन, हवानाच्या आग्नेय दिशेस,३३६ कि.मी.अंतरावर असणाऱ्या,ग्वासीमल या शहराजवळ,सुमारे ५:४२ला ते जमिनीवर धडकले.[५] एका प्रत्यक्षदर्शीनुसार,या विमानाने दाट झाडी असलेल्या ठिकाणी खाली पडण्यापूर्वी,अनेक वेड्यावाकड्या हालचाली केल्यात.[१] ग्वासीमल येथील आरोग्यसेवेस जखमींवर उपचारासाठी सतर्कतेची सुचना देण्यात आली होती, परंतु, मध्यरात्रीनंतर,अपघातात कोणीही वाचु न शकल्यामुळे, ती सुचना परत घेण्यात आली.[१] एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसर्‍या क्रमाचा वाईट अपघात आहे.[२] सन १९८९ मध्ये, ३ सप्टेंबर ला क्युबाना डि एव्हीयाशनच्या एका विमानापघातानंतर, १७१ व्यक्ति ठार झाल्या होत्या,[७], व २७ मे १९७७ ला आणखी एका अपघातात,६९ व्यक्ति दगावल्या होत्या.[८].

शोधमोहिम व बचावकार्य[संपादन]

बचावदलास अपघातस्थळी पोचण्यास, मार्गातील दाट झाडी बुलडोझरने रातोरात साफ करावी लागली.अधिकाऱ्यांनी अपघातस्थळास गराडा घातला व वृत्तसंकलकांना तेथे जाण्यास मज्जाव केला.विमान कोसळण्याने व स्फोटामुळे पूर्णपणे नष्ट झाले होते व प्रवाश्यांचे देह वाईटरित्या जळले होते.अपघाताच्या अनेक तासानंतरही विमानाचे अवशेष जळत होते.[९] सापडलेले मृतदेह हे क्युबाच्या न्यायवैद्यक संस्थेत ओळखण्यासाठी पाठविले जाणार आहेत.[१]. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला, बचावदलाने फ्लाइट डाटा व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर सापडविला.तो अन्वेषकांना सोपविण्यात आला.त्याने हे कळु शकेल कि,दोन टर्बो इंजिने असलेले हे विमान उड्डाणादरम्यान आकाशातुन कां कोसळले व ज्वालांच्या भक्षस्थानी पडले.[१].

प्रवासी व चालकदल[संपादन]

या विमानातील चालकदल व प्रवासी वेगवेगळ्या देशांचे होते.

राष्ट्रीयत्व चालकदल प्रवासी एकुण
क्युबा क्युबा [१] ३३[१] ४०
आर्जेन्टिना आर्जेंटिना - [१०]
मेक्सिको मेक्सिको - [११]
नेदरलँड्स डच - [१२]
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया - [१३]
जर्मनी जर्मनी - [१३]
फ्रान्स फ्रेंच - [१३]
इटली ईटली - [१३]
जपान जपान - [४]
स्पेन स्पेन - [१३]
व्हेनेझुएला व्हेनेझुएला - [१३]
एकुण ६१ ६८

अन्वेषण[संपादन]

'इंस्टिट्युटो डि एरोनॉटिका सिव्हिल डि क्युबा' ही क्युबामधील विमान अपघातांचे अन्वेषण करणारी संस्था आहे.एटीआर विमान कंपनी व फ्रांसचे 'नागरी विमानन अपघात सुरक्षा चौकशी व पृथक्करण ब्युरो' हे सरकारी खाते यात मदत करेल.[१४][१५]

प्रतिक्रिया[संपादन]

 • आर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष Cristina Fernández यांनी मृतांच्या नातेवाईकांना घेउन एक विमान पाठविले.ते मृतांना घेउन परत आले.[१]
 • स्पेनचे प्रधानमंत्री José Luis Rodríguez Zapatero यांनी आपल्या संवेदना कळविल्या.[१]
 • दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी क्युबा विमान अपघाताबद्दल आपल्या संवेदना कळविल्या.[१६]

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. a b c d e f g h i j "क्युबामध्ये ६८ प्रवासी असलेले विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सांगीतले जाते.(इंग्लिश मजकूर)". Reuters. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 2. a b "अपघाताचे वर्णन (इंग्लिश मजकूर)". 5 November 2010 रोजी पाहिले.  Unknown parameter |Publisher= ignored (|publisher= suggested) (सहाय्य)
 3. ^ फ्लाइट इंटरनॅशनल 27 March 2007
 4. a b "प्रवासी विमान क्युबात कोसळले (इंग्लिश मजकूर)". BBC News Online. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 5. a b "६८ लोकांसह विमान क्युबात कोसळल्याचे सांगीतल्या जाते.". New York Times. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 6. ^ Hradecky, Simon. "अपघातःआणीबाणीचा संदेश देउन विमान क्युबात कोसळले". The Aviation Herald. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 7. ^ "अपघात वर्णन (इंग्लिश मजकूर)". The Aviation Herald. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 8. ^ "अपघात वर्णन (इंग्लिश मजकूर)". Aviation Safety Network. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 9. ^ "क्युबातील विमान अपघातात ६८ मृत्युमुखी (इंग्लिश मजकूर)". The New York Times. 6 November 2010 रोजी पाहिले. 
 10. ^ "Accidente aéreo en Cuba: estiman que hay 9 argentinos entre los pasajeros" (स्पॅनिश मजकूर मजकूर). La Nación. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 11. ^ "Пассажирами разбившегося на Кубе самолета были граждане 11 стран" (रशियन मजकूर मजकूर). Lenta. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 12. ^ "3 Nederlanders dood bij crash Cuba" (डच मजकूर मजकूर). Nederlandse Omroep Stichting. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 13. a b c d e f "Relación de fallecidos en el accidente de la aeronave ATR-72-212" (स्पॅनिश मजकूर मजकूर). Juventud Revelde. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 14. ^ "एटीआर विमान कंपनीचे एरो कॅरिबियन उड्डाण क्र.८८३ बद्दलचे निवेदन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ATR. 5 November 2010 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 15. ^ "उड्डाण क्र.८८३ ४ नोव्हेंबर २०१० एटीआर-७२-२१२ नोंदणी-सीयु-टी१५४९". Bureau d'Enquêtes et d'Analyses pour la Sécurité de l'Aviation Civile. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 16. ^ "[१]." BuaNews. November 5, 2010. Retrieved on November 5, 2010.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.