Jump to content

२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी
भूकंप, त्सुनामी, नैसर्गिक संकट, अपघात
भौगोलिक गुणक३°१७′४२″N ९५°५८′५५″E संपादन
तारीख२६ डिसेंबर 2004 संपादन
Modified Mercalli intensity scaleMercalli scale IX संपादन
Map

इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या रिस्टर स्केल इतका मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतो.

त्सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये १० मीटर उंचीच्या लाटा उसळल्या.

जीवितहानी व वित्तहानी

[संपादन]
भूकंपाचे केंद्र व त्सुनामीचा प्रसार

भूकंपाने निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे आग्नेय आशिया, दक्षिण आशिया व पूर्व आफ्रिका प्रदेशांमधील १४ देशांमध्ये जीवितहानी तर १५ देशांमध्ये वित्तहानी झाली.

बाधित देशनिश्चित मृत्यूअंदाजित मृत्यूजखमीबेपत्ताविस्थापितसंदर्भ
इंडोनेशिया १,३०,७३६ १,६७,५४० — ३७,०६३ ५,००,०००+ [१]
श्रीलंका ३५,३२२ ३५,३२२ २१,४११ — ५,१६,१५० [२]
भारत १२,४०५ १६,२६९ — ३,८७४ ६,४७,५९९ [३][४]
थायलंड ५,३९५ ८,२१२ ८,४५७ २,८१७ ७,००० [५]
सोमालिया ७८ २८९ — — ५,००० [६]
म्यानमार ६१ ४००–६०० ४५ २०० ३,२०० [७]
मालदीव ८२ १०८ — २६ १५,०००+ [८]
मलेशिया ६८ ७५ २९९ ६ ५,०००+ [९]
टांझानिया १० १३ — ३ — [१०]
सेशेल्स ३ ३ ५७ — २०० [११]
बांगलादेश २ २ — — — [१२]
दक्षिण आफ्रिका २ २ — — — [१३]
येमेन २ २ — — — [१४]
केनिया १ १ २ — — [१५]
मादागास्कर — — — — १,०००+ [१६]
एकूण अंदाज १,८४,१६७ २,२७,८९८ १,२५,००० ४३,७८९ १७,४०,००० [१७]

भारतातील राज्यनिहाय जीवितहानी

[संपादन]
राज्य / केंद्रशासित प्रदेशनिश्चित मृत्यूबेपत्ताएकूण (अंदाजित मृत्यू)विस्थापित (संख्या)संदर्भ
तमिळनाडू७,९९५—७,९९५३,७८,८८२[१८]
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह१,३१०३,८७४५,१८४४०,०००+[१९]
पाँडिचेरी (पुद्दुचेरी)५९९—५९९४३,४३२[२०]
केरळ१७७—१७७२४,९७०[२१]
आंध्र प्रदेश१०७—१०७१,९६,३२०
इतर (ओडिशा/प. बंगाल)२—२३,९९५[२२]
एकूण (भारत)१२,४०५३,८७४१६,२७९६,४७,५९९

टीप: १. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामध्ये बेपत्ता असलेल्या लोकांची संख्या मोठी होती, ज्यांना नंतर मृत घोषित करण्यात आले. २. तमिळनाडूमध्ये नागपट्टिनम जिल्ह्याला या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Meisl, C.S. (2006). "Housing Reconstruction in Northern Sumatra after the December 2004 Great Sumatra Earthquake and Tsunami". Earthquake Spectra. 22 (3_suppl): 777–802. doi:10.1193/1.2201668.
  2. ↑ "One year after the tsunami, Sri Lankan survivors still live in squalor". World Socialist Web Site. २९ डिसेंबर २००५. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. ↑ "Situation Report on Tsunami affected States/UTs - Dec 31, 2004". Ministry of Home Affairs, Government of India. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ↑ "2004 Indian Ocean Tsunami: 10 facts about the disaster". India Today. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. ↑ "Thai beach marks 10th anniversary of Asian tsunami". Reuters. २६ डिसेंबर २०१४. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. ↑ "Tsunami: Somalia's slow recovery". BBC News. २६ डिसेंबर २००५.
  7. ↑ "Tsunami Myanmar: Situation Report No. 4". UN OCHA. ४ जानेवारी २००५. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ↑ "The 2004 Indian Ocean Tsunami Disaster: Maldives Report". UNICEF. मे २००६.
  9. ↑ "Malaysia: Earthquake and Tsunami OCHA Situation Report No. 6". ReliefWeb. ३० डिसेंबर २००४.
  10. ↑ "Asian tsunami death toll passes 144,000". ABC News Australia. ३ जानेवारी २००५.
  11. ↑ "The Seychelles raises its voice for tsunami recovery". ReliefWeb. ४ नोव्हेंबर २००५.
  12. ↑ Ioualalen, M. (2007). "On the weak impact of the 26 December Indian Ocean tsunami on the Bangladesh coast". Natural Hazards and Earth System Sciences. 7: 141–147.
  13. ↑ Okal, E.A. (2010). "The South Sandwich Islands earthquake: tsunami risk for the southern Atlantic". South African Journal of Geology. 112: 359–370.
  14. ↑ "YEMEN: Tsunami damage over US$1 million". The New Humanitarian. २२ फेब्रुवारी २००५.
  15. ↑ "After the Tsunami: Rapid Environmental Assessment". UNEP. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  16. ↑ "Tsunami devastates Somali island". BBC News. २९ डिसेंबर २००४.
  17. ↑ "2004 Indian Ocean tsunami: Facts, FAQs, and how to help". World Vision. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  18. ↑ "Tsunami 2004 - Relief and Rehabilitation". Government of Tamil Nadu. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  19. ↑ "Situation Report - Andaman & Nicobar Islands". Ministry of Home Affairs. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. ↑ "Puducherry Disaster Management - Tsunami 2004". Government of Puducherry. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  21. ↑ "Tsunami 2004: Kerala State report". Kerala State Disaster Management Authority. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  22. ↑ "2004 Tsunami: Impact on East Coast of India". India Today. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: