१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक
तारीख १९ – २१ जुलै १९८९
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५५ षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान डेन्मार्क डेन्मार्क
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर इंग्लंड जो चेम्बरलेन
सर्वात जास्त धावा इंग्लंड वेंडी वॉट्सन (१२४)
सर्वात जास्त बळी इंग्लंड जो चेम्बरलेन (१०)
(नंतर) १९९०

१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १९-२१ जुलै १९८९ दरम्यान डेन्मार्कमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही पहिली आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान डेन्मार्कसह, इंग्लंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. नायकाबिंग मोर्स मधील नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदानवर सर्व सामने झाले.

डेन्मार्क महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. तसेच डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. सदर स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. इंग्लंडने सर्व तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत स्पर्धा जिंकली. डेन्मार्कला सरासरी धावगतीच्या जोरावर २ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जो चेम्बरलेन हिला सर्वाधिक गडी बाद केल्यामुळे मालिकावीर घोषित केले गेले. इंग्लंडच्याच वेंडी वॉट्सन हिने स्पर्धेत सर्वाधिक १२४ धावा केल्या.

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (विजयी) ३.३६१
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २.२८६
Flag of the Netherlands नेदरलँड्स २.०९२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २.०१९

गट फेरी[संपादन]

१९ जुलै १९८९
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१२०/९ (५५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२१/३ (५१.५ षटके)
लिली लॉरसेन २४ (१२४)
मिरियम ग्रीली २/१७ (११ षटके)
ॲन मरे ६०* (१७१)
मार्लेन स्लॅबॅजर १/१७ (११ षटके)

१९ जुलै १९८९
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
९१/७ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९२/३ (३१.१ षटके)

२० जुलै १९८९
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
११०/९ (५५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११४/६ (५३.४ षटके)
निकोला पेन ३५ (९७)
एलिझाबेथ ओवेन्स २/१६ (११ षटके)
नेदरलँड्स महिला ४ गडी राखून विजयी.
नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदान, नायकाबिंग मोर्स
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • नेदरलँड्स महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२० जुलै १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९७/६ (५१ षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
९३/९ (५१ षटके)
वेंडी वॉट्सन ९०* (१५१)
जानी जॉनसन ४/३८ (१० षटके)
जानी जॉनसन २५ (४६)
जो चेम्बरलेन ४/१७ (११ षटके)
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ५१ षटकांचा खेळविण्यात आला.
  • डेन्मार्क आणि इंग्लंड या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शार्लोट कॉर्नेलियसन (डे) आणि जुली क्रम्प (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२१ जुलै १९८९
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७२/६ (५५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९३ (५३.४ षटके)
सुझॅन मेटकाफ ३४* (५४)
अ‍ॅनी लाईहान २/२८ (८ षटके)
ॲन मरे २४ (५७)
जो चेम्बरलेन ५/१८ (१०.४ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

२१ जुलै १९८९
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१५५/७ (५५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३५ (५३.५ षटके)
डेन्मार्क महिला २० धावांनी विजयी.
नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदान, नायकाबिंग मोर्स
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • डेन्मार्क आणि नेदरलँड्स या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • डेन्मार्क महिलांचा पहिल वहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • डेन्मार्क महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.