युआन श्वांग
(ह्युएनत्संग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
ह्युएन-त्सांग (चिनी: 玄奘) (इ.स.६०३ - इ.स. ६६४) हा एक चिनी विद्वान होता. ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात तो भारतात आला. त्याचा जन्म चीनमधील हुनान या प्रांतात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात त्याने चीन पालथा घातला परंतु त्याचे समाधान न झाल्याने त्याने भारतात येण्याचे ठरवले.
भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला. काश्मिरपासून तक्षशिला, मथुरा,काशी, कपिलवस्तू,पाटलीपुत्र,नालंदा अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. याकाळात त्याने वेद, भाषा, व्याकरण,आयुर्वेद,तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. इ.स.६४५ मध्ये तो चीनला परत गेला.