होटगी
होटगी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे.
?होटगी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सोलापूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
होटगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे जंक्शन आहे. येथून विजापूर व गदगकडे एक रेल्वेमार्ग जातो.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]सिद्धपुरुष श्रीमत्स्वामी समर्थ सद्गुरू श्री कृष्णानंद महारज बालब्रह्मचारी गोवेकर यांचा आश्रम होटगी गावालगत असून सद्गुरू श्री कृष्णानंद महारज व सद्गुरू श्री ब्रह्मानंद महारज यांची समाधी मंदिरे आहेत. वर्षातून रामनवमीला मोठी यात्रा भरते व कुष्माण्ड नवमीला पुण्यतिथी असते.सद्गुरू श्री कृष्णानंद महारज यांनी अनेको चमत्कार करून दाखवल्याचे जुने वयोवृद्ध नागरिक सांगतात.सन १९३७ कुष्माण्ड नवमीला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले.
होटगी गावातच सुतार आळीत मल्लप्पाचे देऊळ नावाने एक छोटंस देऊळ आहे,त्यामागची कथा अशी की स्वातंत्र्य्पूर्व काळात काशिनाथ सुतार नावाचा मुलगा लहानपणी घरातून पळून गेला व फिरत फिरत बंगालप्रांती पोहचला तेथे राहून बंगाली विद्या शिकला त्याला गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती पण बंगाली सोडत नव्हते एक दिवस संधी साधून तेथुन पळ काढला व सरळ गाव गाठले व आपला पारंपारिक सुतारकीचा व्यवसाय करू लागला. विनाकारण आपल्या विद्येचा कोणालाही त्रास दिला नाही (त्याच्याबरोबर त्याने पकडून आण्लेली भुते होती असे म्हणतात),पण वर्षाकाठी जे शेतकरी राबता(धान्यरूपी वर्षाची मजूरी)देत नव्हते त्यांच्या शेतातली कणसे तो लाकूड तासल्यावर जे तुकडे पडतात ती पाचरं हवेत उडवायचा त्याची पाखरे व्हायची व ती कणसे खुडून त्याच्यासमॊर टाकायची. तो लाकडी घोड्यावर बसून रोज पहाटे काशीला आंघोळीला जायचा.अलिकडच्य़ा काळात त्या मंदिरामागची भिंत पडली त्याचे बांधकाम करताना त्या घोड्याचे अवशेष सापडले होते.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |