हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ 香港國際機場 | |||
---|---|---|---|
आहसंवि: HKG – आप्रविको: VHHH | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
प्रचालक | हाँग काँग विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | हाँग काँग | ||
स्थळ | चेक लाप कोक, हाँग काँग | ||
हब | कॅथे पॅसिफिक कॅथे ड्रॅगन हाँग काँग एरलाइन्स एच.के. एक्सप्रेस यू.पी.एस. एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २८ फू / ९ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 22°18′32″N 113°54′52″E / 22.30889°N 113.91444°E | ||
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ५,६०,५७,७५१ |
हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: HKG, आप्रविको: VHHH) हा हाँग काँग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रिम बेटावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हाँग काँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.
कॅथे पॅसिफिक, ड्रॅगनएर, यू.पी.एस. एरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हाँग काँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५०हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |