हुतात्मा साहित्य संमेलन
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
हुतात्मा राजगुरू यांच्या ८३व्या बलिदान दिनानिमित्त राजगुरुनगर येथे १ले हुतात्मा साहित्य संमेलन २५ मार्च २०१४ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष सु.ल. खुटवड होते. हुतात्मा राजगुरू साहित्य परिषद व हुतात्मा राजगुरू स्मारक समितीने प्रथमच हे संमेलन भरविले. हे संमेलन सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकूण नऊ तास चालले.
संमेलनाच्या कार्यक्रमांत माधव पाटील व उत्तम सदाकाळ यांचे कथाकथन, ७५ कवींचा सहभाग असलेले, कवी म.बा. चव्हाण्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले कवि संमेलन, रवींद्र चौधरी यांचे एकपात्री नाटक आणि आणि विनोद कुलकर्णी यांचे जादूच्या प्रयोगांचा समावेश होता. संमेलनात पंढरीनाथ थिगळे यांच्या ’पोवाडे’ या पुसतकाचे प्रकाशन झाले.
हुतात्मा साहित्य संमेलनाच्या दिवशी लेखक दीपाकांत राक्षे यांना साहित्य गौरव व मुंबई माता-बाल संगोपन केंद्राचे सचिव डॉ. माधव साठे यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आले.[ संदर्भ हवा ]
पहा :साहित्य संमेलने