Jump to content

उत्तम सदाकाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


उत्तम सदाकाळ हे एक मराठी लेखक, विनोदी कवी आणि कथाकथनकार आहेत. ते एम.ए. बी.एड. आहेत. जुन्नर तालुक्यातील करंजाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते प्राथमिक शिक्षक आहेत.

दैनिक सकाळच्या 'गुदगुल्या' सदरात सदाकाळ यांच्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या आहेत.

शालेय क्रमिक पुस्तक-बालभारतीच्या मराठीसह इंग्रजी, उर्दू, कानडी, गुजराती, तेलुगू, सिंधी, हिंदी अशा आठ भाषांतील दुसरीच्या पुस्तकांत त्यांच्या एका कवितेचा समावेश झाला आहे.

उत्तम सदाकाळ यांनी लिहिलेली काही पुस्तके[संपादन]

 • अग्निदिव्य (बालवाङ्मय)
 • आईची माया (बालवाङ्मय)
 • गणपतीबाप्पा संकटात (बालवाङ्मय)
 • गंमतगाणी (बालवाङ्मय)
 • झुंज (कादंबरी)
 • धोबीपछाड (कथासंग्रह)
 • टाईमबॉंब (कथासंग्रह)
 • देवबाप्पा (सामाजिक कादंबरी)
 • धुके (अनुवादित कथासंग्रह, मूळ राजस्थानी 'शापमुक्ति', लेखक माधव नागदा)
 • पंढरीचा चोर (बालसाहित्य)
 • पाठलाग (बालसाहित्य)
 • पाहुणचार (कथासंग्रह)
 • पिंपळाची विहीर (बालवाङ्मय)
 • प्रतापगड (बालवाङ्मय)
 • बंदिनी (कादंबरी)
 • म्हसोबाचा कोंबडा (कथासंग्रह)
 • वनराणी (बालवाङ्मय)
 • वाघोबा (बालवाङ्मय)
 • विरह (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक - कैलाशचंद्र शर्मा)
 • शेरास सव्वाशेर (बालकथासंग्रह)
 • ससुल्या (बालवाङ्मय)

उत्तम सदाकाळ यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

 • आदर्श शिष्यवृत्ती शिक्षक पुरस्कार
 • उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार
 • उत्तम शिक्षकाचा पुरस्कार
 • तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार
 • पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार
 • यशवंत पुरस्कार
 • युवा साहित्यिक समाजगौरव पुरस्कार
 • शिवांजली भूमिपुत्र पुरस्कार
 • ज्ञानप्रेरणा पुरस्कार