स्वामी सत्यमित्रानंद
Hindu guru (1932-2019) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १९, इ.स. १९३२ आग्रा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून २५, इ.स. २०१९ हरिद्वार | ||
नागरिकत्व |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
स्वामी सत्यमित्रानंद (जन्म : आग्रा, २९ सप्टेंबर १९३२; - २५ जून २०१९) हे सहसा स्वामी सत्यमित्रानंद गिरी म्हणून ओळखले जाणारे हिंदू आध्यात्मिक गुरू होते.[१] त्यांना ज्योतिर्मठ येथील उपपेठाच्या जगतगुरू शंकराचार्याचा मुगुट देण्यात आला. जून १९६९मध्ये स्वामींनी हिंदू धर्म प्रसार करण्यासाठी (जेव्हा शंकराचार्यांनी भारत / भारतात राहणे आवश्यक होते) जगभर प्रवास केला.
ते हरिद्वारमधील प्रसिद्ध ' भारत माता मंदिरा'चे संस्थापक आहेत. मंदिराचे उद्घाटन तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ मे १९८३ रोजी केले. आदिवासी व डोंगराळ भागातील गरीब लोकांना मोफत शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देऊन त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९८८ साली[२] जगभरात समन्वय परिवार, समन्वय कुटीर, अनेक आश्रम आणि इतर अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांची स्थापना केली आहे.
स्वामी सत्यमित्रानंद यांनी त्यांच्या अखेरच्या पाच दशकांत अनेक देशांचा दौरा केला आणि अनेक देशांत त्यांचे अनुयायी तयार झाले. त्यांनी केन्या, युगांडा आणि आफ्रिकेतील इतर देशांसह इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, फिजी, मॉरिशस आणि फिलिपाईन्स या देशांना भेटी दिल्या आहेत.[३]
स्वामी सत्यमित्रानंद ह्यांचे वडील शिवशंकर पांडे आणि आई त्रिवेणी देवी यांनी त्यांचे नाव अंबिका प्रसाद ठेवले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांना भारतीय राष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. स्वामी सत्यमित्रानंद यांनी हिंदी आणि संस्कृत यांचा अभ्यास केला आणि एम.ए. ही पदवी आग्रा विद्यापीठातून (आताचे डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ) मिळविली. त्याच विद्यापीठातून हिंदी भाषा व साहित्यात त्यांनी "साहित्यरत्न" पदवी, व वाराणसी विद्यापीठातून शास्त्री पदवी मिळविली. शिक्षणानंतर ते स्वामी वेदव्यासनंद यांच्या संपर्कात आले. त्यांनी ह्यांना शिष्य म्हणून स्वीकारले, संन्यास दिला आणि त्यांचे नाव सत्यमित्रानंद ठेवले.
संदर्भ[संपादन]
- ^ "Birth date". Archived from the original on 2020-10-20. 2021-03-29 रोजी पाहिले.
- ^ "swami_satyamitranand_foundation". Archived from the original on 2013-09-27. 2021-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Bharatmatamandir". Archived from the original on 2018-08-26. 2021-03-29 रोजी पाहिले.