Jump to content

मिरवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिरवेल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याला आयुर्वेदात "मरीच" असे म्हणतात. याचे फळ काळे मिरे (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) म्हणून प्रसिद्ध आहे. हा मसाल्याचा एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय तिखट असतात. हे अग्निदीपनाचे कार्य करते.

काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.