Jump to content

स्मृती मंधाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्म्रिती मंधना या पानावरून पुनर्निर्देशित)
स्मृती मानधना
व्यक्तिगत माहिती
जन्म १८ जुलै, १९९६ (1996-07-18) (वय: २८)
मुंबई, महाराष्ट्र,भारत
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत

[[]], इ.स.
दुवा: [] ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर)

स्मृती श्रीनिवास मानधना [](१८ जुलै, १९९५:सांगली, महाराष्ट्र, भारत - ) ही भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. मानधना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डब्ल्यूपीएल स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स, बेंगलोर या संघाकडून खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती महाराष्ट्र राज्याकडून खेळते.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

१८ जुलै १९९६ मध्ये मुंबई येथे मारवाडी कुटुंबात स्मृतीचा जन्म झाला. तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडिलांचे नाव श्रीनिवास आहे. [] स्मृती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब माधवनगर, सांगली येथे राहण्यास आले. तिचे वडील आणि भाऊ, श्रावण दोघेही सांगली जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय किक्रेट खेळत असत. भावाला महाराष्ट्र राज्य १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळताना पाहून स्मृतीला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

वयाच्या नवव्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षे वयाखालील संघामध्ये निवड झाली. वयाच्या अकराव्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या १९ वर्षे वयाखालील संघामध्ये निवड झाली.[]

कारकीर्द

[संपादन]

ऑक्टोबर २०१३ मध्ये ती एक दिवसीय सामन्यात द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. पश्चिम विभाग १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बडोदा येथे गुजरातविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना तिने १५० चेंडूत नाबाद २२४ धावा केल्या.[]

२०१६ मध्ये विमेन्स चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळताना मानधनाने इंडिया रेड संघासाठी तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके केली. या स्पर्धेत ती सगळ्यात जास्त धावा करणारी खेळाडू ठरली.[]

शिक्षण

[संपादन]

स्मृती मानधना ही चिंतामण व्यापार महाविदयालयाची विदयार्थीनी आहे[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Smriti Mandhana's House Tour". Youtube. 11 March 2021.
  2. ^ "https://timesofindia.indiatimes.com/news/Smriti-Mandhana-logs-Test-win-on-debut-in-UK/articleshow/40326248.cms". External link in |title= (सहाय्य)
  3. ^ "The prodigious journey of Smriti Mandhana". ESPNcricinfo. 2023-02-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Smriti makes good use of Dravid's bat, scores double ton". 2013-10-31. ISSN 0971-8257.
  5. ^ "Smriti Mandhana stands out with her consistency". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 2023-02-18 रोजी पाहिले.