Jump to content

स्कर्दू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कर्दू
سکردو‎
पाकिस्तानमधील शहर
स्कर्दू येथील काही पर्यटनस्थळे
स्कर्दू is located in पाकिस्तान
स्कर्दू
स्कर्दू
स्कर्दूचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 35°17′25″N 75°38′40″E / 35.29028°N 75.64444°E / 35.29028; 75.64444

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रदेश गिलगिट-बाल्टिस्तान
क्षेत्रफळ ७७ चौ. किमी (३० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,३१० फूट (२,२३० मी)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


स्कर्दू (उर्दू: سکردو‎; बाल्टी: སྐར་དོ) हे पाकव्याप्त काश्मीर भागाच्या गिलगिट-बाल्टिस्तान ह्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर बाल्टिस्तान भागात सिंधू व शिगर ह्या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून ७,३१० फूट इतक्या उंचीवर वसले आहे. येथे काराकोरमहिमालय ह्या पर्वतरांगा जुळतात. गिलगिट खालोखाल स्कर्दू हे ह्या भागातील एक प्रमुख पर्यटनकेंद्र असून ८००० मीटरहून अधिक उंचीवर असणारी सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी स्कर्दू हा महत्त्वाचा तळ आहे.

गिलगिटमधून धावणारा काराकोरम महामार्ग स्कर्दूला उर्वरित पाकिस्तानसोबत जोडतो. येथील स्कर्दू विमानतळावरून इस्लामाबादसाठी दैनंदिन विमानसेवा चालते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील स्कर्दू पर्यटन गाईड (इंग्रजी)