Jump to content

स्कंदगुप्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट स्कंदगुप्त
सम्राट
सम्राट स्कंदगुप्ताचे सोन्याचे नाणे, ज्याच्या समोर स्वतःचे चित्रण आहे, तर मागे लक्ष्मीचे चित्रण आहे. सम्राटाच्या डाव्या हाताखाली स्कंद-दा हे नाव उभे दिसते.
अधिकारकाळ इ.स. ४५५ - इ.स. ४६७
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ४५५
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव स्कंदगुप्त
मृत्यू इ.स. ४५५
गुप्त साम्राज्य
पूर्वाधिकारी कुमारगुप्त
उत्तराधिकारी पुरुगुप्त
वडील कुमारगुप्त
राजघराणे गुप्त राजवंश

सम्राट स्कंदगुप्त हा गुप्त साम्राज्याचा सम्राट होता. हा सम्राट कुमारगुप्त याचा पुत्र होता. त्याच्या आईच्या नावाचा उल्लेख इतिहासात कुठे केलेला नाही.


स्कंदगुप्त हा गुप्त साम्राज्यातील शेवटचा सम्राट मानला जातो व गुप्त साम्राज्याचे पतन याच्या काळात चालू झाले. स्कंदगुप्त हा इ.स. ४५५ ते इ.स. ४६७ पर्यंत गुप्त साम्राज्याचा राजा होता. स्कंदगुप्तच्या काळात अनेक उठाव झाले जे शमवण्यात स्कंदगुप्तची कारकीर्द पणास लागली. पुष्यमित्र हा मध्य भारतातील एक गट होता ज्याने गुप्त साम्राज्या विरुद्ध उठाव केला. स्कंदगुप्तने हा उठाव यशस्वीपणे शमवला परंतु यानंतर वायव्य अशियातून आलेल्या हूण टोळ्यांचा स्कंदगुप्तला सामना करावा लागला. स्कंदगुप्त ने कुमारगुप्तच्या काळापासून हूणांचा सामना करून पराभव केला होता त्यामुळे त्याला सेनानी म्हणून चांगलीच प्रशंसा झाली होती. हूणांचे आक्रमण परतावून लावले परंतु पूर्ण नियंत्रण अवघड गेले. परंतु सातत्याच्या लढाया व उठावांमुळे गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. अलाहाबाद येथील शिलालेखांमध्ये हरिसेन याने स्कंदगुप्तच्या कारकिर्दीचे वर्णन केले आहे.