सुनीता विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स ( सप्टेंबर १९, इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे.[१] २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती.[२] सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना , अँना ही ३ वर्ष मोठी होती

सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली.

शिक्षण[संपादन]

• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

सैनिकी कारकीर्द[संपादन]

सुनीता विल्यम्स मे १९८७ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मायामी, फ्लोरिडा येथे झालेल्या बचावकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासामध्ये निवड झाली.

नासा कारकीर्द[संपादन]

  1. ^ ""Sunita L. Williams (Commander, USN)". National Aeronautics and Space Administration" (PDF). no-break space character in |title= at position 39 (सहाय्य)
  2. ^ "Sunita Williams in her maternal ancestors' homeland one more time".