सुनीता नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुनीता नारायण
Sunita Narain CSE.jpg
जन्म इ.स. १९६१
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण दिल्ली विद्यापीठ, क्राॅन्फील्ड विद्यापीठ (इंग्लंड), कलकत्ता विद्यापीठ
पेशा पर्यावरणतज्ज्ञ
पुरस्कार पद्मश्री


सुनीता नारायण या भारतीय पर्यावरणवादी, लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१]

२०१६ मध्ये त्यांचे नाव टाईम मॅगेझीनच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादीमध्ये दिले होते.[२]

त्या सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायराँन्मेन्ट या संस्थेच्या संचालिका तसेच ‘डाऊन टु अर्थ’ मासिकाच्या संपादक आहेत. सेंटर फॉर एनव्हायराॅन्मेन्टल कम्युनिकेशनच्याही त्या संचालिका आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]

त्यांच्या आठव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने चार मुलींचे संगोपन केले. त्यांचे आजोबा श्रीकृष्ण हे पत्रकार होते. सुनीता नारायण यांना त्यांच्या आजोबां आणि आईकडून पर्यावरण, बागकाम, इत्यादीची आवड निर्माण झाली. तिच्यातून त्यांनी त्यासंबंधी अभ्यास केला. शाळेत असताना कल्पवृक्ष या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेद्वारे त्यांचा चिपको आंदोलनातील महिलांशी संपर्क आला व पर्यावरणसंबंधी समस्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.[३]

कामाचे स्वरूप[संपादन]

 • सन १९८० च्या आसपास सुनीता यांनी अनिल अग्रवाल या पर्यावरण तज्ज्ञाबरोबर काम सुरू केले व १९८५ मध्ये अग्रवाल यांच्यासह त्यांनी भारतीय पर्यावरणाची स्थिती या विषयावर एक अहवाल संपादित केला. भारतातील पर्यावरणाचे प्रश्न येथील गरीबांच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहेत हे या अहवालात नोंदविले आहे.[४]

अग्रवाल यांच्यासह त्यांनी ग्रामीण भागातून वनीकरणाची चळवळीत भाग घेतला व हवामानाचा प्रश्नाचा अभ्यास केला. या दरम्यान स्थानिक जंगलांचे व्यवस्थापन आणि जागतिक हवामानाचे व्यवस्थापन हे निगडित असल्याची त्यांनी नोंद केली.

 • सन २००२ मध्ये दिल्लीची हवा शुद्ध करण्याचे काम त्यांनी केले.[५] वाहनांसाठी इंधन म्हणून सीएनजीचा प्रभावी वापर सुरू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.[६]
 • बाटलीबंद पाण्यात कीटकनाशके असल्याने ते पाणी प्यायला अयोग्य आहे असा अभ्यास त्यांनी सीएसईच्या प्रयोगशाळेत केला. या पाण्याचे कधीही परीक्षण केले गेले नसल्यामुळे हा निकाल स्वीकारताना समाजातून त्यांना विरोध झाला. काही कालानंतर बीआयएसने बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची मानके बदलली आणि नियम अधिक कडक केले.[७]

विचार[संपादन]

CSE या आपल्या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणविषयक काम त्या करीत आहेत. संस्थेचे लक्ष तिच्या उद्दिष्टांवर, मोहिमेवर असले पाहिजे. त्यामुळे संस्था हे अंतिम साध्य न बनता साधन बनते असे विचार त्या नोंदवितात.[८]

विशेष योगदान[संपादन]

 • सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या कमी झाल्यानंतर वाघांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम टायगर टास्क फोरम या संस्थेने केले. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार त्यांनी या फोरमचे अध्यक्षपद भूषविले आहे.
 • प्राईम मिनिस्टर्स कौन्सिल ऑन क्लायमेट चेंज आणि गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी स्थापन झालेल्या गंगा रिव्हर बेसिन ऑथॉरिटीच्या त्या सदस्या होत्या.

प्रकाशित साहित्य[संपादन]

पर्यावरण संवर्धन याविषयी पुस्तके आणि निबंध प्रकाशित.[९]

सन्मान[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'Why I don't advocate vegetarianism': Indian environmentalist Sunita Narain explains her position".
 2. ^ http://time.com/4299642/sunita-narain-2016-time-100/
 3. ^ किडवाई नैना लाल,अनुवाद गजेंंद्रगडकर वर्षा, ३० सामर्थ्यशाली स्त्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृृष्ठ ३१६ ते ३२७
 4. ^ http://www.cseindia.org/aboutus/sn_biodata.htm
 5. ^ किडवाई नैना लाल,अनुवाद गजेंंद्रगडकर वर्षा, ३० सामर्थ्यशाली स्त्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृृष्ठ३२०
 6. ^ किडवाई नैना लाल,अनुवाद गजेंंद्रगडकर वर्षा, ३० सामर्थ्यशाली स्त्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृृष्ठ ३२०
 7. ^ http://www.cseindia.org/aboutus/sn_biodata.htm
 8. ^ Global Warming in an Unequal World: A case of environmental colonialism, Anil Agarwal, Sunita Narain, Centre for Science and Environment, New Delhi, (1990).
 9. ^ Green Politics: Global Environmental Negotiations, Anil; Sunita Narain, Anju Sharma, Centre for Science and Environment (1999) Dying Wisdom: Rise, Fall and Potential of India's Traditional Water Harvesting Systems, (State of India's Environment, Volume 4), Anil Agarwal, Sunita Narain, Centre for Science and Environment (1997) Cited in The No-Nonsense Guido International Development, Maggie Black, New Internationalist (1 October 2007)
 10. ^ Sunitaji's Bio Data
 11. ^ किडवाई नैना लाल,अनुवाद गजेंंद्रगडकर वर्षा, ३० सामर्थ्यशाली स्त्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृृष्ठ ३१६ ते ३२७
 12. ^ Honoris Cause