Jump to content

चर्चा:सुनीता नारायण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाला साचा कोणी लावला आहे माहिती नाही!! पण मी गेले काही काळ सातत्याने लेखन करीत आहे त्यामुळे ज्ञानकोशीय लेखन काय असते हे मला माहिती आहे. नुसतीच भारंभार लेखांवर लेख चढविणा-या संपादकांपेक्षा हे काम नकीच चांगले झाले आहे. ज्यांना बदल करावेसे वाटतात त्यांनी करा पण मूळ संपादक या नात्याने मला या लेखात काहीच चुकीचे वाटत नसल्याने मी साचा काढीत आहे. आणि या अशा विषयांवर वृथा चर्चा करण्यात वेळ दवडणे यापेक्षा अधिक सकस कामासाठी ती उर्जा वापरण्याची माझी इच्छा आहे. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) तसेच यात अविश्वसनीय मजकूर काहीही नाही. उत्तम दर्जाच्या पुस्तकातून माहिती घेवून हा लेख संपादित केला आहे आणि त्याचा योग्य प्रकारे संदर्भही नोंदविला आहे.आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी: कृपया, गैरसमज करून घेऊ नका, म्हणणे समजून घ्या. सुरूवातीची रचना बदल करण्यासाठी मी हा 'बदल' साचा लावला होता. स्वत:च्या लेखाला स्वत:च विश्वसनीय ठरवत बदल साचा काढणे हे मूळ संपादकाचे काम नसते. असा प्रकारचा साचा लावणाऱ्याने साचा लावण्यापेक्षा लेखात संपादन/बदल करणे योग्य असते असा मोघम सल्लाही योग्य नसतो, कारण प्रत्येक वेळीच असा साचा लावणाऱ्याला लेखसुधार शक्य असतोच असं नाही. आणि आपल्या माहितीस्तव आपण बनवलेल्या लेखात कोणी अन्य सदस्याने 'बदल' किंवा सुधारासंबंधी साचा लावला असता तो साचा लेख निर्मात्याने काढू नये. इतर वरीष्ठ सदस्यांनी तो लेख योग्य असल्याची खात्री करून तो साचा काढावा लागतो.' लेख सुधारून हा बदल साचा काढण्यासाठी इतर सदस्यांना आपण सांगू शकता. तसेच प्रत्येकाच्या ‘लेख लिहिण्याच्या भिन्न पद्धती’ असतात, मात्र आपलीच पद्धत योग्य व इतरांची चूकीची, असा ग्रह असणे चूकीचा आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ११:५३, ७ मार्च २०१८ (IST)[reply]

संदर्भ

[संपादन]

नमस्कार @आर्या जोशी: कृपया नोंदघ्यावी की आपण एक ज्ञानकोशीय सामग्री लिहित आहोत. आपण या ज्ञानकोशात मधे जे काही जोडता आहात त्यासाठी कृपया विश्वसनीय स्रोत प्रदान करा. अधिक माहिती साठी विकिपीडिया:संदर्भ द्या पाहावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:१७, ७ मार्च २०१८ (IST)[reply]

या लेखात जेथे जेथे संदर्भ हवा असा साचा लावला होता तो प्रत्येक साचा काढला आहे कारण अधिकृत संदर्भ तेथे जोडले आहेत.आर्या जोशी (चर्चा)

संदर्भ, बदल साचा, इ

[संपादन]

@आर्या जोशी, Tiven2240, आणि संदेश हिवाळे:,

सुनीता नारायण आणि निरूपमा राव या दोन्ही लेखांबद्दलच्या चर्चा येथे करीत आहे. तिघांसाठी मी काही सूचना करीत आहे त्या सकारात्मक दृष्टिकोनातून वाचाव्या. यात व्यक्तिगत हेवेदावे आणू नयेत (आणत आहात असे नाही, पण मुद्दाम सूचना करीत आहे.) तसेच या सूचना फक्त तुमच्यासाठी नसून सगळ्यांसाठीच आहेत. येथे साधकबाधक चर्चा झाल्यावर ध्येय धोरणांमध्ये समावेश करता येईल.

०. बदल साचा हा लेखनात बदल करण्याचे सुचवतो. याला व्यक्तिगत टीका समजू नये. असा बदल लावणाऱ्याने कारणे देणे अपेक्षित आहे परंतु नेहमी ते होतेच असे नाही. प्रश्न पडल्यास चर्चा पानावर लिहावे किंवा साचा लावणाऱ्यास थेट विचारावे.

१. कोणताही लेख ज्ञानकोशीय शैलीत लिहावा. त्रोटक वाक्ये न वापरता पूर्ण वाक्ये लिहावीत. या लेखाचेच उदाहरण केले तर आपल्या कार्याबद्दल भारत सरकारने ‘पद्मश्री’पुरस्काराने सन्मानित केलेल्या लेखिका आणि पर्यावरण तज्ज्ञ. असे मोडके वाक्य लिहिण्यापेक्षा सुनीता नारायण या आपल्या कार्याबद्दल भारत सरकारने ‘पद्मश्री’पुरस्काराने सन्मानित केलेल्या लेखिका आणि पर्यावरण तज्ज्ञ आहेत. अशी पूर्ण प्रस्तावना करावी. संदर्भ दिल्यास उत्तमच.

२. पहिल्या उताऱ्यात विषयवस्तूचे सर्वाधिक महत्वाच्या गुणधर्माबद्दल लिहावे. चरित्रलेखात व्यक्तीने केलेल्या सर्वाधिक उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती असावी, उदा - कपिलदेव हे भारताचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मानले जातात. हे लिहावे पण कपिलदेव हे भारतातील गोल्फ खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंपैकी एक आहेत. हे वाक्य इतर विभागात लिहावे. असे न केल्यास पहिल्याच उताऱ्यात माहितीची खिचडी होते व वाचकाचे लक्ष खेचून ठेवणे अवघड होते.

३. चरित्र लेखात व्यक्तीपूजा, स्तुती किंवा उदात्तीकरणाला मुळीच थारा देऊ नये, उदा. त्यांनी अमुक पद भूषविले असे लिहिण्यापेक्षा त्या अमुक पदावर क्ष ते फ काळावर होत्या. तसेच खाजगी माहितीला ज्ञानकोशावर फारसा उपयोग नाही. अमुकांना गुलाब खूप आवडतात. याने वाचकाच्या माहितीत उपयुक्त भर काय? आता त्या आवडीतून त्यांनी गुलाबावर संशोधन केले किंवा गुलाबाच्या बागांचे संवर्धन केले तर हे वाक्य कदाचित लिहिणे बरोबर पण संशोधन/संवर्धन हे आवड असल्याशिवाय होणार नाही हे ही खरे. असे असता हे वाक्य (गुलाब आवडतात) टाळलेलेच बरे.

४. कौटुंबिक माहिती लिहिण्यास हरकत नाही परंतु तेथे प्रस्तुत व्यक्तीशी सुसंगत इतकीच माहिती घालावी. अमक्याची बहीण पदवीधर आहे आणि अमेरिकेत असते या माहितीचा व्यक्तीच्या कार्याशी थेट संबंध नसल्यास असे लिहिणे टाळावे.

५. शक्य तितके संदर्भ द्यावे. हा नियम मराठी विकिपीडियावर इंग्लिश विकिपीडियाइतका काटेकोरपणे (अद्याप) पाळला जात नाही परंतु आपण सुरुवात केल्यास पुढे येणाऱ्या लेखकांना तो मानक ठरेल.

६. ब्लॉग, फेसबूक किंवा तत्सम सोशल मीडियावरील ग्राह्य धरले जात नाहीत (या लेखांत ते नाहीत हे स्पष्ट करतो). असे संदर्भ काढून टाकावे. अनेकदा खोडसाळ लोक आपल्या ब्लॉगची प्रसिद्धी होण्यासाठी येथे ते संदर्भ म्हणून घालतात. त्यास त्वरित आळा घालण्यास मदत करावी.

सगळ्यात महत्वाचे (कोणा एकास नाही, आपल्या सगळ्यांनाच हे लागू आहे) --

७. चर्चा करताना अझ्यूम गुड फेथ हे विकिपीडियाचे तत्त्व नेहमी लक्षात ठेवावे. व्यक्तिगत आरोप किंवा खोचक टीका करू नये. जे असेल ते स्पष्ट, सुसंगत, तार्किक आणि मुद्देसूद लिहावे. उलटपक्षी टीका किंवा सूचना आल्यास तो अपमान समजून हमरीतुमरीवर येऊ नये.

आशा आहे वरील स्पष्टीकरणाने किंचित कलुषित वातावरण निवळेल. नेहमीप्रमाणे प्रश्न किंवा शंका असल्यास कळवावे म्हणजे अधिक स्पष्टीकरण करता येईल.

तुम्हा सगळ्यांना येथील योगदानाबद्दल धन्यवाद. येथे लेखन/संपादन करणाऱ्यात तुमचा वाटा इतर अनेकांपेक्षा नक्कीच अधिक आहे आणि तो वाढावा ही आशा/अपेक्षा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:४६, ८ मार्च २०१८ (IST)[reply]


धन्यवाद नातू सर.
बदल साचा हा लेखनात बदल करण्याचे सुचवतो व लेखाला उत्तम बनवण्यासाठी वापरला जातो. परंतु याला @आर्या जोशी: यांनी त्यांच्यावरील व्यक्तिगत टीका समजून उलट माझ्यावरच टिका केली व मला अनेक सल्लेही दिले, जरी मी त्यांनी बनवलेल्या बऱ्याच लेखात लेख/टंकनदोष सुधारण्याचे काम केले आहे. कदाचित हे स्वत:च्या लेखनाबद्दलच्या अतिविश्वासामुळे झाले असावे. असो, पण भविष्यात त्यांनी माझ्यासोबत वा इतर अन्य सदस्यांसोबत असे वागू नये ही अपेक्षा. इतर सदस्यांनीही इतरांसोबत असे वागणे टाळावे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:१३, ८ मार्च २०१८ (IST)[reply]
@संदेश हिवाळे:,
पुन्ही एकदा नम्र आठवण - चर्चा करताना अझ्यूम गुड फेथ हे विकिपीडियाचे तत्त्व नेहमी लक्षात ठेवावे. व्यक्तिगत आरोप किंवा खोचक टीका करू नये.
तुमच्याच प्रमाणे आर्या जोशी यांनीही अनेक लेखांत बदल आणि सुधारणा केल्या आहेत. अनेकदा गैरसमज होतात ते झाल्यास ते दूर करण्याचाच प्रयत्न करावा. असे करताना पुन्हा व्यक्तिगत टीका/टिप्पण्या करुन अधिक गुंता करू नये.
अभय नातू (चर्चा) २२:२८, ८ मार्च २०१८ (IST)[reply]


ठिक आहे. --संदेश हिवाळेचर्चा २२:३१, ८ मार्च २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:

@संदेश हिवाळे:

नमस्कार नातू सर! तुमच्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद! मला योग्य प्रकारे माहिती समजली आहे आणि ती वापरण्याचा मी प्रयत्न करीन.संंदेश हिवाळे हे मला मदत करत असतात अणि सूचनाही.त्यामुळे समन्वय होत असतो. पण काही वेळेला सातत्याने होणारे हल्ले व्यक्ती म्हणूनही त्रासदायक ठरू शकतात आणि मग ते असे कुठेतरी प्रतिबिंंबीत होतात.त्यासाठी क्षमस्व! या व्यासपीठाचा दर्जा उत्तम राखला जावा आणि आपल्या लेखनाच्या निमित्ताने आपलाही अभ्यास होतो हे लक्षात आले असल्याने गुणवत्तेची मानके पाळणे महत्वाचे वाटते. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:१९, ९ मार्च २०१८ (IST)[reply]