सुधीर जोशी
सुधीर जोशी | |
---|---|
जन्म | इ.स. १९४८ |
मृत्यू |
१४ डिसेंबर, इ.स. २००५ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
सुधीर जोशी (इ.स. १९४८ - १४ डिसेंबर, इ.स. २००५) हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. यांनी मराठी चित्रपट, नाटके, तसेच दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला.
जीवन
[संपादन]सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. मुंबईतल्या ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी [१] होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले.
कारकीर्द
[संपादन]चित्रपट-कारकीर्द
[संपादन]वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
इ.स. १९८५ | अनंतयात्रा | हिंदी | गोडबोले | |
इ.स. १९८७ | गंमत जम्मत | मराठी | ||
प्रेमासाठी वाट्टेल ते | मराठी | |||
इ.स. १९८९ | भुताचा भाऊ | मराठी | ||
बाळाचे बाप ब्रह्मचारी | मराठी | |||
आत्मविश्वास | मराठी | डॉ. बाळासाहेब सरपोतदार | ||
इ.स. १९८८ | अशी ही बनवाबनवी | मराठी | सरपोतदार | |
इ.स. १९९१ | आयत्या घरात घरोबा | मराठी | ||
इ.स. १९९४ | वझीर | मराठी | ||
इ.स. १९९५ | लिमिटेड माणुसकी | मराठी | ॲड्व्होकेट भास्करराव | |
इ.स. २००६ | मातीच्या चुली | मराठी | श्रीपाद दांडेकर |
नाट्य-कारकीर्द
[संपादन]वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | भूमिका | टिप्पणी |
---|---|---|---|---|
टुर टुर | मराठी | |||
हसता हसता | मराठी |
दूरचित्रवाणी-कारकीर्द
[संपादन]वर्ष (इ.स.) | कार्यक्रम | भाषा | भूमिका/सहभाग | टिप्पणी |
---|---|---|---|---|
कॉमेडी डॉट कॉम | मराठी |
मृत्यू
[संपादन]नोव्हेंबर, इ.स. २००५ मध्ये "हसता हसता" या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली [२]. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. शिवाजी पार्क येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले [२].
या सुमारास "मातीच्या चुली" या जोशी यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या भूमिकेचे उरलेले काम अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी पुरे केले [३].
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ विपणन अधिकारी (इंग्लिश: Marketing Executive, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह).
- ^ a b "अभिनेते सुधीर जोशी यांचे निधन". १३ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सुधीर जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |