सुदीप (अभिनेता)
Appearance
सुदीप कन्नड: ಸುದೀಪ್ | |
---|---|
जन्म |
सुदीप संजीव शिमोगा, कर्नाटक |
इतर नावे | किच्चा सुदीप |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | |
कारकीर्दीचा काळ | १९९७ ते आजपर्यंत |
भाषा | कन्नड |
पत्नी |
प्रिया राधाकृष्णा (ल. २००१) |
अपत्ये | १ |
अधिकृत संकेतस्थळ |
www |
सुदीप, सुदीप संजीव किंवा किच्चा सुदीप हे एक भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, गायक आणि दूरचित्रवाणी सादरकर्ता आहेत.
सुदीप संजीव यांचा जन्म २ सप्टेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील शिमोगा गावी झाला. त्यांची मातृभाषा कन्नड असून ते कन्नड चित्रपटातील सुपरस्टार आहेत. सुदीप यांनी हिरो तसेच खलनायकाच्या भूमिका निभावल्या आहेत. कन्नड व्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, तामिळ तसेच हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले.
सुदीप संजीव यांनी बंगळुरू मधील दयानंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.[२]
सुदीप संजीव हे कन्नड भाषेतील बिग बॉस-कन्नड कार्यक्रमाचे सूत्र-संचालक म्हणून सुद्धा सुप्रसिद्ध आहेत.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "#BaadshahSudeepBdayCDP: Fans start wishing Kiccha Sudeep in advance - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 31 August 2019. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Kiccha Sudeep Birthday: इंजीनियरिंग की पढ़ाई के बाद एक्टिंग की दुनिया में आए किच्चा सुदीप, जानिए और भी कई रोचक बातें" (हिंदी भाषेत). २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "फिनाले के कुछ दिन बाद ही बिग बॉस के सेट से आई बुरी खबर, मेकर्स को लगा 9 करोड़ रुपए का चूना" (हिंदी भाषेत). २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.