सीता और गीता
Appearance
सीता और गीता | |
---|---|
दिग्दर्शन | रमेश सिप्पी |
निर्मिती | जी.पी. सिप्पी |
कथा | सलीम-जावेद |
प्रमुख कलाकार |
हेमा मालिनी संजीव कुमार धर्मेंद्र |
संगीत | आर.डी. बर्मन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९७२ |
अवधी | १६६ मिनिटे |
सीता और गीता हा १९७२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या सीता और गीतामध्ये हेमा मालिनी दुहेरी भूमिकेत चमकली आहे. ह्या भूमिकेसाठी हेमा मालिनीला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
सीता और गीताचे कथानक एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींवर आधारित आहे. जन्माच्या वेळी ह्या बहिणी अलग होतात व वेगवेगळ्या वातावरणांमध्ये वाढतात. पुढे दोघींची अदलाबदल होते ज्यामधून गोंधळ उडतो अशा स्वरूपाची कथा सीता और गीतामध्ये रंगवली आहे. १९६७ सालच्या राम और श्याममध्ये देखील अशाच प्रकारचे कथानक होते. ह्यानंतर जुळ्या बहिणी अथवा भावांच्या कथानकाचा फॉर्म्युला चालबाज (श्रीदेवी), जुडवा (सलमान खान), किशन कन्हैया (अनिल कपूर), डुप्लिकेट (शाहरुख खान), कुछ खट्टी कुछ मीठी (काजोल) इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये वापरण्यात आला.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सीता और गीता चे पान (इंग्लिश मजकूर)