सायकस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायकस
सायकस

सायकॅडेलीज गणातील व सायकॅडेसी कुलातील ही एक प्रजाती असून हिच्या सुमारे २० जाती उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. शोभेकरिता त्यांची बागेत लागवड करतात. अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवर जिन्मोस्पर्मस अस्तित्वात आहेत. पॉलिओझोईकमध्ये म्हणजे साधारण साडेसव्वीस कोटी वर्षापूर्वी झाला आणि त्यांची भरभराट डायनोसॉरबरोबर, म्हणजे ज्युरॅसिकमध्ये साडेएकोणीस कोटी वर्षापूर्वी झाली. संपूर्ण मेसोझोअिकमध्ये हवामान या झाडांच्या वाढीला अनुकूल होते. सुरुवातीला म्हणजे ट्रायासिकमध्ये हवा जरा रूक्ष होती.परंतु ज्युरॅसिकमध्ये थोडी ओलसर दमट झाली. पुरेसे ऊन, भरपूर पाऊस, थंडी यामुळे जीन्मोस्पर्मसच्या अनेक जाती आणि प्रजाती यांची या कालखंडात उत्तम वाढ झाली. पुढे ज्युरॅसिकच्या शेवटी शेवटी व क्रिटेशिअसच्या काळात म्हणजे साधारण साडेतेरा कोटी वर्षापूर्वी पर्णी झाडांच्या प्रजाती कमी होऊ लागल्या. याचे एक कारण म्हणजे हवामान ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या दूषित वायुमुळे दूषित आणि उष्ण होऊ लागते, ते या झाडांना सहन होत नाही. दुसरे कारण असे की,क्रिटेशिअस काळामध्ये सपुष्प वनस्पती वाढू लागल्या. हवामान सपुष्प वनस्पतींना जास्त अनुकूल असल्याने जीवनाच्या संघर्षात, स्पर्धेत त्यांचे प्राबल्य वाढले.इतर जातींच्या वनस्पती नामशेष होऊ लागल्या.

उगम[संपादन]

सायकस हे उष्ण कटिबंधातील झाड आहे.हे अत्यंत पुरातन वनस्पतींपैकी एक असून याचा जन्म अपर ट्रायासिॲकमध्ये सुमारे वीस कोटी वर्षापासून झाला.त्यानंतर ज्युरॅसिक व क्रिटेशिअस या काळात या जातींच्या झाडांनी उच्चांक गाठला, पण त्यानंतर मात्र त्यांचा ऱ्हास होऊन आता सायकस व त्यांचे भाऊबंद मिळून फक्त दहा जाती शिल्लक आहेत. सायकसच्या काही जाती अतिशय जुन्यापुराण्या, पूर्वजांपासून चालत आल्या आहेत. त्यांच्या गुणांच्या जपणुकीमुळे त्यांना लिव्हिंग फॉसिल्स किवा जिवंत जीवाश्म म्हणतात. सायकस हे निर्माण झाले ऑस्ट्रेलियात आणि वेगवेगळ्या बेटांच्या फुलांवरून मार्ग काढत दक्षिण जपानमध्येचीन,मादागास्करभारत येथे येऊन पोचले.त्यानंतर त्याची लागवड होऊन त्याचा पसारा वाढला आणि ते बऱ्याच ठिकाणी दिसू लागतो. जिन्मोस्पर्ममध्ये दुसरा प्रकार आहे तो सूचिपर्णी वृक्षांचा. जिन्मोस्पर्ममध्ये त्यांचा पूर्वज सापडतो. सध्या पृथ्वीवर आढळणारे सूचिपर्णी वृक्ष तरुण म्हणजे साडेसहा कोटी वर्षापूर्वीचेच आहेत

Cycas media megasporophylls with nearly-mature seeds on a wild plant in north Queensland, Australia
Grove of Cycas media in north Queensland
Cycas platyphylla in north Queensland with new flush of fronds during the rainy season, still with glaucous bloom


सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यपट्ट्यांनी उत्तर गोलार्धात पृथ्वीला जवळजवळ संपूर्ण विळखा घातला आहे. युरोपच्या पश्चिम टोकापासून म्हणजे म्हणजे स्वीडन,नाॅर्वेपासून यांची सुरुवात झाली असून ते थेट आशियाच्या पूर्वेला बेरिंगच्या सामुद्रधुनीपर्यंत पसरलेले आहेत.उत्तर अमेरिकेतही अलास्का पासून पुढे हे अरण्य वाढलेले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात अनेक प्रकारच्या सूचिपर्णी वृक्षांची घनदाट अरण्ये आहेत.

रचना[संपादन]

सूचिपर्णी वृक्ष थंड हवेच्या ठिकाणी वाढतात. तिथे भन्नाट वाहणारा वारादेखील असतो. त्यामुळे ही झाडे एकमेकांना चिकटून आणि उंच उंच वाढतात. पण त्या मानाने या झाडांचा विस्तार कमी असतो. यांचा बुंधा अडीच ते तीन फूट व्यासाचा असतो तर अगदी शेंड्याजवळचे खोड जाडीला करंगळी एवढे असते. खालच्या फांद्या लांबीला जास्त असतात. जसजसे वर वर जाऊ तसतशी फांद्यांची लांबी कमी कमी होत जाते. या विशिष्ट रचनेमुळे यांना शंक्वाकृती आकार प्राप्त होतो. उंच पर्वतशिखरांवर वर्षातील बराच काळ हिमवर्षाव होत असतो. त्यामुळे झाडे हिमकणांनी भरून जातात. ते हिमकण लवकर ओघळून जावेत म्हणून निसर्गाने त्यांना हा वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला आहे.त् यामुळे ते प्रतिकूल परिस्थितीत, प्रचंड थंडीवाऱ्यात टिकाव धरू शकतात.

वर्णन[संपादन]

सूचिपर्णी हे सदापर्णी वृक्ष दिसण्यास माडाच्या झाडासारखे मात्र लहान असून ते १·५० ते ६·५० मी. उंच असतात. यांच्या जाडजूड खोडावर फांद्या नसतात; परंतु टोकांस अनेक मोठ्या संयुक्त व पिसासारख्या गर्द पानांचा झुबका असतो. यांशिवाय रूक्ष,जाड, पिंगट व खवल्यांसारख्या अनेक लहान पानांमुळे (शल्कपर्णामुळे), गळून गेलेल्या जुनाट हिरव्या पानांच्या किणांमुळे (वणांमुळे) आणि पर्णतलांच्या अवशेषांनी खोडाचा पृष्ठभाग व्यापलेला व खरबरीत झालेला असतो. हिरवी पाने, खवले व प्रजोत्पादक अवयव (बीजुकपर्णे) एकाआड एक येतात आणि खवले इतर भागांचे कोवळेपणी संरक्षण करतात.

सूचिपर्णी वृक्षांची पानही दाभणासारखी टोकदार असतात.म्हणून त्यांना 'सूचिपर्णी' 'सुईसारख्या पानांचे वृक्ष' म्हणतात. अशा पानांमुळे जोराने वाहणारे वारेही झाडांची दुर्दशा करू शकत नाही. शिवाय पानांवर मेणासारखे आवरण असते.त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. कडाक्याच्या थंडीतही संरक्षण होते. या पानांच्या सुया एकेकट्या नसतात, तर त्यांचे गुच्छ असतात. एका गुच्छात अशा किती सुया आहेत यावरून पाईनच्या प्रजाती ठरवल्या जातात. जेव्हा पानगळ होते तेव्हा तेव्हा हा गुच्छच झडून खाली पडतो आणि पायथ्याशी या गुच्छांचा खच पडून जमीन संपूर्ण झाकून टाकणारा गालीचा तयार होतो.

उपयोग[संपादन]

या वृक्षांच्या खोडात व बियांत आढळणाऱ्या पिठूळ पदार्थापासून साबुदाणा काढतात, त्यामुळे काही जातींना इंगजीत ‘सॅगो पाम’ असे म्हणतात. साधारणपणे हे वृक्ष सात वर्षांचे झाल्यानंतर, बिया येण्यापूर्वी कापून पाडतात; प्रथम बाहेरील साल काढून आतील खोडाच्या भागाच्या चकत्या करून व त्या उन्हात सुकवून त्याचे पीठ करतात. नंतर ते पीठ पाण्यात घालून ढवळतात; त्यामुळे त्यातील स्टार्च अलग होतो. १२० सेंमी. लांबीच्या खोडापासून सुमारे २·५ किलॊग्रॅम साबुदाणा मिळतो. बियांपासूनही साधारणपणे तितकाच साबुदाणा मिळत असल्याने साबुदाणा बनविण्यासाठी मुख्यतः बियाच वापरणे फायद्याचे ठरते. बियांत सुमारे ३१ % स्टार्च शिवाय काही विषारी पदार्थही असतात. पीठ पुनःपुन्हा धुऊन घेतल्यास विषारीपणा जातो.

संदर्भ[संपादन]