सांगोला विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांगोले विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हा अराखीव आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचननुसार, या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश होतो.

हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण आणि माण या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. [१][२]

शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष सदस्य पक्ष
१९५१ केशवराव राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७[a] केशवराव राऊत
मारुती कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
१९६७
१९७२ एस. बापूसाहेब पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७४ [b] गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
१९७८
१९८०
१९८५
१९९०
१९९५ शहाजीबापू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
२००४
२००९[४]
२०१४[५]
२०१९ शहाजीबापू पाटील[६] शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला[६]
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना शहाजीबापू पाटील 99,464 46.16
शेकाप अनिकेत देशमुख 98,696 45.81
अपक्ष राजश्रीताई दत्तात्रय नागणे पाटील 4,486 2.08
बहुमत 786
मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकाप गणपतराव देशमुख 94,374 47.62 -
शिवसेना शहाजीबापू पाटील 69,150 34.89
भाजप श्रीकांत आप्पासाहेब देशमुख 14,946 7.10
बहुमत 25,224
मतदान 1,98,197


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सांगोला
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकाप गणपतराव देशमुख 86,548 34.28
काँग्रेस शहाजीबापू पाटील 76,744 30.40
जनसुराज्य पक्ष श्रीकांत आप्पासाहेब देशमुख 13,997 0.99
बहुमत 9,804
मतदान 2,52,474


संदर्भ[संपादन]

  1. ^ २-सदस्य मतदारसंघ
  2. ^ पोटनिवडणूक
  1. ^ 2-member constituency
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2009". Election Commission of India. 25 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2014". Election Commission of India. 7 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Maharashtra Legislative Assembly Election, 2019". Election Commission of India. 2 February 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]