सरस्वती गोरा
सरस्वती गोरा | |
---|---|
जन्म |
२८ सप्टेंबर १९१२ |
मृत्यू |
१९ ऑगस्ट, २००६ (वय ९३) |
पुरस्कार | जमनालाल बजाज पुरस्कार (१९९९), जानकी देवी बजाज पुरस्कार, पोट्टी श्रीरामुलू तेलुगु विद्यापीठ पुरस्कार |
सरस्वती गोरा (२८ सप्टेंबर १९१२ - १९ ऑगस्ट २००६) या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात अनेक वर्षे नास्तिक केंद्राचे नेते म्हणून काम केले.
चरित्र
[संपादन]१९३० च्या दशकात, सरस्वती गोरा यांनी त्यांचा नवरा गोरा यांच्यासह देवदासींचे विवाह आणि विधवांचे पुनर्विवाह केले. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक सुधारणेच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेतल्यानंतर, त्यांना १९४४ मध्ये सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात आमंत्रित करण्यात आले, जिथे त्या दोन आठवडे राहिले.
सरस्वती गोरा यांनी आपल्या नवऱ्याच्या सोबतीने १९४० मध्ये नास्तिक केंद्राची स्थापना केली. नास्तिकता, बुद्धिवाद आणि गांधीवादावर आधारित मानवी मूल्यांचा प्रचार करणे हे त्यांचे ध्येय होते.[<span title="This claim needs references to reliable sources. (April 2018)">संदर्भ हवा</span>]
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय कार्यकर्त्या, त्यांना भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगवास भोगावा लागला. आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला, नियंताला घेऊन त्या तुरुंगात गेल्या होत्या.[<span title="This claim needs references to reliable sources. (April 2018)">संदर्भ हवा</span>]
वैयक्तिक जीवन
[संपादन]२०१२ मध्ये त्यांचे आत्मचरित्र माय लाइफ विथ गोरा प्रकाशित झाले. ते तेलुगू भाषेमध्ये होते. १९ ऑगस्ट २००६ रोजी विजयवाडा येथे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला.[१]
पुरस्कार आणि ओळख
[संपादन]२००० मध्ये, कर्नाटक सरकारने प्रदान केलेल्या बसव पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. त्या मानवतावादासाठी केलेल्या कामासाठी त्यांना जीडी बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्काराची देखील प्रदान करण्यात आला आहे. जमनालाल बजाज पुरस्कार (१९९९)[२] जानकी देवी बजाज पुरस्कार[३] आणि पोट्टी श्रीरामुलू तेलुगु विद्यापीठ पुरस्कार देखील त्यांना देण्यात आले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Saraswathi Gora passes away". The Hindu. 20 August 2006. 21 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Jamnalal Bajaj Awards Archive". Jamnalal Bajaj Foundation.
- ^ "Veteran freedom fighter Saraswathi Gora dies". Oneindia. 19 August 2006. 5 February 2017 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- सुनंदा शेट यांचे इंडियन स्केप्टिकमधील सरस्वती गोरा यांचे छोटे चरित्र
- डेक्कन हेराल्डमधील मृत्युलेख
- www.newsfix.de येथे मृत्यूपत्र Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
- इ.स. १९१२ मधील जन्म
- इ.स. २००६ मधील मृत्यू
- भारतीय महिला चरित्रकार
- २०व्या शतकातील भारतीय शिक्षक
- २०व्या शतकातील लेखिका
- भारतीय महिला गैर-काल्पनिक लेखक
- भारतीय आत्मचरित्रकार
- भारतीय मानवाधिकार कार्यकर्ते
- महिला भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यां
- आंध्र प्रदेशातील कार्यकर्ते
- २०व्या शतकातील भारतीय महिला शैक्षणिक सिद्धांतकार
- २०व्या शतकातील भारतीय सामाजिक शास्त्रज्ञ
- २०व्या शतकातील भारतीय महिला शास्त्रज्ञ
- २१व्या शतकातील भारतीय लेखिका
- विजयवाडामधील लोक
- भारतीय महिला कार्यकर्त्या
- तेलुगू लेखक
- तेलुगू लेखिका
- भारतीय नास्तिक
- भारतीय संशयवादी
- आंध्र प्रदेशातील भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- आंध्र प्रदेशच्या राजकारणातील महिला
- २०व्या शतकातील भारतीय शैक्षणिक सिद्धांतकार
- आंध्र प्रदेशातील लेखिका
- आंध्र प्रदेशातील महिला शास्त्रज्ञ
- आंध्र प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते
- आंध्र प्रदेशातील शिक्षिका
- विजयवाडा येथील शास्त्रज्ञ
- २१व्या शतकातील भारतीय चरित्रकार
- महिला आत्मचरित्रकार
- २०व्या शतकातील भारतीय शिक्षिका