Jump to content

सद्गुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जग्गी वासुदेव उर्फ सदगुरू हे एक योगी आणि दिव्यदर्शी आहे. ते इशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी लाभरहित संस्था आहे, जी योग शिबीर चालवते.[] इशा फाऊंडेशन भारतासहित 'अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. आणि त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी योजना राबविते. युनायटेड नेशन्सच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत (ECOSOC) इशा फाऊंडेशनला विशेष सल्लागार म्हणून मान्यता प्राप्त आहे.[]

सद्गुरू
जन्म जग्गी वासुदेव
३ सप्टेंबर १९५७
म्हैसूर, म्हैसूरचे राज्य, भारत
निवासस्थान कोइंबतूर
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए
प्रशिक्षणसंस्था म्हैसूर विद्यापीठ
पेशा योग गुरू
प्रसिद्ध कामे
  • इनर अभियांत्रिकी
  • ध्यानलिंग
  • नद्यांसाठी रॅली
  • लिंग भैरवी
  • आदियोगी: योगाचा स्रोत
  • मिस्टिकचे संगीत
  • कावेरी कॉलिंग
  • सेव्ह सॉईल
पुरस्कार पद्म भूषण(२०१७)[]
संकेतस्थळ
http://isha.sadhguru.org/


प्रारंभिक जीवन / बालपण

[संपादन]

जग्गी वासुदेव यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉक्टरक्टर होते. त्यांच्या आर्इने एका ज्योतिषास त्यांचे भविष्य विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हया मुलाचे आयुष्य अतीशय भाग्यवान असेल म्हणून त्यांचे नाव जगदिश असे ठेवण्यात आले. जग्गी जसे जसे समजूतदार होत गेले तसे तसे त्यांची ओढ ही निसर्गाकडे वाढू लागली व ते जवळपासच्या जंगलात सहलीला जाऊ लागले. कधी कधी दोन तीन दिवसही त्यांचे वास्तव्य जंगलात असे. इतके ते निसर्गाशी एकरूप होत असत. वयाच्या 11व्या वर्षी जग्गी राघवेंद्र राव उर्फ मल्लाडीहल्ली स्वामी यांच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला व मनापासून तो आत्मसात केला.

प्राथमिक शालेय शिक्षणानंतर त्यांनी म्हैसूर विश्वविदयालयातून इंग्रजी भाषा विषयात पदवी मिळवली. विश्वविदयालयात शिकत असताना त्यांना गिर्यारोहणात व मोटरसायकल चालवण्यात रूची वाढू लागली. म्हैसूरमधील चामुंडी टेकडी त्यांचे व त्यांच्या मित्रांचे आवडते ठिकाण होते. ते सर्व तिथे वारंवार जात असत. जग्गी भारतात ठिकठिकाणी मोटारसायकलवर प्रवास करत असत. भारत-नेपाळच्या सीमारेषेवर पासपार्ट नसल्यामुळे आडवण्यात आले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली व त्यांनी अर्थप्राप्ती करून स्वावलंबी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी काही उदयोगही सुरू केले. उदा: पोल्ट्री फार्म, विटा बनवणे, बांधकाम इ.[ संदर्भ हवा ]

आध्यात्मिक अनुभव

[संपादन]

वयाच्या पंचविसाव्या वर्षी 23 सप्टें. 1982 रोजी ते चामुंडी टेकडीवर एका दगडावर बसलेले असतांना त्यांना आध्यात्मिक अनुभूती झाली. त्या अनुभवासंदर्भात ते असे सांगतात की,"माझ्या आयुष्यात त्या क्षणा पर्यंत मी स्वतः व सृष्टीत फरक करू शकत होतो. पण त्या आत्मानुभूतीनंतर मी सृष्टीपासून वेगळा समजू शकत नव्हतो. जेथे तेथे मी स्वतःलाच बघू लागलो. जसे दगडात,आकाशात, सगळीकडे." हा अनुभव त्यांना वारंवार येऊ लागला. या घटनेनंतर त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली. त्यांना आलेला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले पूढील जीवन समर्पित करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इशा फाऊंडेशन आणि इशा योगाची स्थापणा केली.[ संदर्भ हवा ]

इशा फाऊंडेशन

[संपादन]

इशा फाऊंडेशन हे कोर्इंबतूर मधील वेलींगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकशे पन्नास एकरमध्ये पसरलेले आहे. ही संस्था दोन लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांदवारे चालवली जाते. हया संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी प्रोजेक्ट ग्रीनहॅंन्डस योजना राबवली आहे. 17 आक्टो. 2006 मध्ये तमिळनाडूतील 27 जिल्हयात लोकांच्या मदतीने 8.52 लाख झाडे लावली. त्यामुळे गिनीजबुकमध्ये एक नवीन रेकार्ड बनले. 2008 मध्ये हया महत्त्वपूर्ण कार्यासाठी इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कारही मिळाला.[ संदर्भ हवा ]

इशा योगा केंद्र

[संपादन]

ध्यानलिंग इशा योगा केद्रात स्थापित करण्यात आले आहे. मनुष्याला उच्च स्तराच्या मानसिक पातळीवर पोहोचण्यासाठी याची स्थापणा करण्यात आली. इशा योगा केंद्र हे शक्तीशाली स्थान योगाच्या चार मार्गाने (ज्ञान, कर्म, क्रिया,भक्ती) मनुष्याला अंतरमुख होण्यास मदत करते. ध्यानलिंग योगमंदिराची प्रतिस्थापणा 1999 साली जग्गींनी पूर्ण केली. 13 फूट व 9 इंच असलेले ध्यान लिंग जगातील सर्वात मोठे लिंग आहे. ध्यानलिंग हे कुठल्याही एका संप्रदायाशी निगडीत नाही तर संपूर्ण मानवतेशी निगडीत आहे. ध्यान लिंगाच्या प्रवेशदवारावर सर्वधर्म स्तंभ स्थापित केले आहे ज्यात या स्तंभावर हिंदू, मुसिलम, इसार्इ, जैन, बौदध, शीख, ताओ, पारशी, यहूदि आणि शिन्तो धर्माचे प्रतिक कोरलेले आहे. हे धार्मिक मतभेदाच्या पलीकडे सर्व मानवतेला आमंत्रित करते.[ संदर्भ हवा ]

कावेरी कॉलिंग

[संपादन]

कावेरी कॉलिंग प्रकल्पाचे उद्दीष्ट अग्रोफॉरेस्ट्रीच्या माध्यमातून अंदाजे २.४ अब्ज झाडे लावण्यात मदत करणे आहे, ज्यायोगे ते संवर्धनाचे साधन म्हणून कावेरी खोऱ्यात एक तृतीयांश झाडे झाडे व्यापतील. या प्रकल्पाला राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांकडून प्रशंसा मिळाली आहे.

तथापि, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सार्वजनिक विचारवंतांचा असा आरोप आहे की हा कार्यक्रम नदी संवर्धनाचा साधेपणाचा दृष्टिकोन प्रस्तुत करतो, सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा करतो आणि त्यात उपनद्या आणि वन्यजीव अधिवास हानी पोचविण्याची क्षमता आहे. कर्नाटक उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या उपक्रमासाठी निधी उभारणीच्या पद्धतींच्या कायदेशीरपणाबद्दल, तसेच अभ्यासाला पाठिंबा न देता खासगी हेतूसाठी सरकारी मालकीच्या जमिनीचा वापर करण्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. जानेवारी २०२० मध्ये, हायकोर्टाने असा निर्णय दिला की फाउंडेशनला पुढाकाराशी संबंधित त्याच्या निधी उभारणीच्या पद्धतींचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे.[ संदर्भ हवा ]

टीका

[संपादन]

टीकाकारांचा असा दावा आहे की वासुदेव भारतीय जनता पक्षाच्या हिंदू राष्ट्रवाद (हिंदुत्व) या विचारसरणीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमांमधून ते "असहिष्णु राष्ट्रवादी" भूमिका घेत आहेत. ते संपूर्ण गोहत्या बंदीचे समर्थन करतात. वसुदेव यांनी बालाकोट हवाई हल्ला, सर्वसमावेशक जीएसटी लागू करणे आणि नागरिकत्व (सुधारणा)विधेयक, 2019च्या बाजूने देखील भाष्य केले आहे, तर थुथुकुडी प्रकरणाचा निषेध केला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kiderlin, Sophie. "Indian spiritual guru, followed by Will Smith and Tom Brady, says it's life rather than lifestyle that really matters". CNBC (इंग्रजी भाषेत). 2022-09-21 रोजी पाहिले.
  2. ^ "UNEP accredits Isha Foundation to the United Nations Environment Assembly". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-09-21 रोजी पाहिले.
  3. ^ "सद्गुरू अवॉर्ड". the Hindu.