म्हैसूरचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वरील नकाशात गडद हिरव्या रंगामध्ये म्हैसूरचे राज्य दाखवले आहे. निळ्या रंगाची रेखा विद्यमान कर्नाटक राज्य दर्शवते.

म्हैसूरचे राज्य हे १९४८ ते १९५६ दरम्यान अस्तित्वात असलेले भारत देशाचे एक राज्य होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूर संस्थानाचा महाराजा जयचामराजेंद्र वडियार ह्याने आपले संस्थान भारतामध्ये विलिन करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार १९४८ साली म्हैसूर हे स्वतंत्र भारताचे एक राज्य बनले. ह्या राज्याची राजधानी म्हैसूरमध्ये होती.

१९५६ साली भारत सरकारने देशामधील प्रशासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर केला. त्यानुसार म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवून बेळगाव जिल्हा, विजापूर जिल्हा, धारवाड जिल्हाउत्तर कन्नड जिल्हा हे चार बॉम्बे राज्यातील जिल्हे; बेल्लारी जिल्हा, दक्षिण कन्नड जिल्हाउडुपी जिल्हा हे तीन मद्रास राज्यातील जिल्हे तसेच कोप्पळ जिल्हा, रायचूर जिल्हा, गुलबर्गा जिल्हाबीदर जिल्हा हे तीन हैदराबाद राज्यातील जिल्हे म्हैसूरमध्ये समाविष्ट केले गेले. त्याचबरोबर कूर्ग हे छोटे राज्य देखील म्हैसूर राज्यामध्ये आणले गेले व त्याचा कोडागु जिल्हा बनवण्यात आला. म्हैसूर राज्याची राजभाषा कन्नड होती.

१ नोव्हेंबर १९७३ रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे ठेवण्यात आले.