Jump to content

सदस्य चर्चा:Sonali yogiraj

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Sonali yogiraj, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Sonali yogiraj, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७६९ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ११:३१, ८ मे २०२४ (IST)[reply]

गावांच्या लेखातील प्रस्तावना

[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.

तुम्ही महाराष्ट्रातील गावांबद्दलचे लेख लिहीत असताना प्रस्तावनेमध्ये या लेखातील माहिती २०११ च्या शिरगणतीनुसार आहे. शिरगणतीत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. न लिहीता ते लेखाच्या शेवटी लिहावे.

आत्तापर्यंत तयार केलेल्या लेखांमध्ये सुद्धा हा बदल करावा ही विनंती.

अभय नातू (चर्चा) १६:१८, ९ मे २०२४ (IST)[reply]

या संदेशाची लगेचच नोंद घ्यावी.
अभय नातू (चर्चा) १०:४७, १० मे २०२४ (IST)[reply]

तुमचे लक्ष जावे म्हणून तुम्हाला १० मिनिटांचा प्रतिबंध घातला आहे. १० मिनिटांनी तो आपोआप दूर होईल तरी वरील संदेशांची दखल घ्यावी.

पुन्हा एकदा तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:५३, १० मे २०२४ (IST)[reply]

आग्रहाची विनंती

[संपादन]

तुम्ही या संदेशांकडे लक्ष देत नाही आहात असे दिसते आहे. कदाचित हे संदेश कसे पहावे हे माहिती नसावे.

तरीसुद्धा तुम्ही तयार करीत असलेल्या (मुख्यत्वे कॉपी-पेस्ट) लेखांमधील त्रुटी त्वरित काढाव्यात ही आग्रहाची विनंती.

अभय नातू (चर्चा) ०३:३४, ११ मे २०२४ (IST)[reply]

cc: @संतोष गोरे:

ता.क. उदाहरणादाखल वेळोदे या लेखात बदल करुन दाखवले आहेत.
अभय नातू (चर्चा) ०६:५५, ११ मे २०२४ (IST)[reply]
संबंधित दुरुस्ती लक्ष्यात आणून दिले त्याबद्दल धन्यवाद Sonali yogiraj (चर्चा) १०:५०, १४ मे २०२४ (IST)[reply]

अविश्वकोशीय मजकूर, ललित लेखन

[संपादन]

नमस्कार,

तुमचे बव्हंश लेख ललित लेखनाच्या शैलीतील आहेत. विकिपीडियावर अशा शैलीस स्थान नाही, तरी योग्य ते बदल त्वरित करावेत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) अभय नातू (चर्चा) १०:१२, १४ मे २०२४ (IST)[reply]

तुम्ही कोणत्याच संदेशाची दखल घेत नसल्याने नाईलाजाने तुम्हाला पुन्हा एकदा अवरुद्ध (ब्लॉक) करीत आहे.
वरील संदेशांची किमान पोच तरी द्यावी.
अभय नातू (चर्चा) १०:४१, १४ मे २०२४ (IST)[reply]
@अभय नातू सर आपल्या सूचनांचे स्वागत करून (लेखन शैली) मध्ये लक्ष देऊन तो दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करेन, धन्यवाद. Sonali yogiraj (चर्चा) १०:५४, १४ मे २०२४ (IST)[reply]
उत्तराबद्दल धन्यवाद.
प्रतिबंध काढला आहे.
अभय नातू (चर्चा) ११:००, १४ मे २०२४ (IST)[reply]

तुमच्या अलीकडील लेखांमध्ये पुन्हा त्याच त्रुटी दिसत आहेत. लगेचच बदल करावेत.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०६:४३, १५ मे २०२४ (IST)[reply]

अनेकदा संदेश देउन आणि उदाहरणादाखल बदल करुन दाखवून सुद्धा तुमच्या लेखनात फरक पडत नाही हे पाहून खेद वाटतो.
तुमचे पुन्हा एकदा लक्ष जावे म्हणून तुम्हाला काही काळा करता अवरुद्ध करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:०७, १६ मे २०२४ (IST)[reply]

ललितलेखन

[संपादन]

नमस्कार,

तुम्ही आज लिहिलेले लेख अविश्वकोशीय शैलीत लिहिलेले आहेत. हे लिखाण एखाद्या विश्वकोशात नाही तर अनुदिनी (ब्लॉग) किंवा वर्तमानपत्राच्या ललितस्तंभाला अनुरूप असे आहे.

कृपया असे लिखाण विकिपीडियावर थेट घालू नयेत. लिहायचे झाल्यास ते धूळपाटी/अबकड अशा शीर्षकाखाली लिहून नंतर योग्य त्या विश्वकोशीय लेखात घालावा.

या संदेशाची नोंद घेउन त्याला उत्तर द्यावे ही आग्रहाची विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०४:५५, २४ जून २०२४ (IST)[reply]

ता.क. नम्र आठवण -- इतर ठिकाणी प्रकाशित झालेला मजकूर किंवा प्रताधिकारित मजकूर येथे जशाचातसा उतरवून काढणे किंवा नकल-डकव करू नये.

जिल्ह्याचे नाव

[संपादन]

नमस्कार,

तुम्ही लेखांमध्ये जिल्ह्याचे नाव म. कॉर्प असे का लिहिता?

अभय नातू (चर्चा) ११:४९, २६ जून २०२४ (IST)[reply]

@Sonali yogiraj: नमस्कार, कृपया चर्चापानावर कुणी चर्चेसाठी सुरुवात केल्यास उत्तर देणे. इथे आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ काढून मोफत योगदान देत असतो, अशावेळी एकमेकांचे बोट धरून चालायचे असते. असो. आपण नुकतेच अंजनविहिरे व इतर गावांचे लेख लिहिले आहेत, ज्यात जिल्ह्याचे नाव जळगाव (म. कॉर्प.) जिल्हा असे नोंदवले आहे. या ऐवजी जळगाव जिल्हा असे लिहिल्यास अधिक बरे होईल. - संतोष गोरे ( 💬 ) ०९:०३, २७ जून २०२४ (IST)[reply]
नमस्ते सर,
आपण आमची चूक लक्ष्यात आणून दिल्या बद्दल आपले धन्यवाद, या पुढील लेख प्रकाशित करताना आपण दिलेल्या सूचनांचे पालन नक्कीच करेन, व या आधीच्या लेखात योग्य तो बदल देखील करिन
धन्यवाद. Sonali yogiraj (चर्चा) १५:४३, २७ जून २०२४ (IST)[reply]
धन्यवाद, आपण केलेला फरक देखील दिसत आहे. फक्त एक दुरुस्ती करवी, जळगाव जिल्हा असे अचूक लेखनाव जोडावे. - संतोष गोरे ( 💬 ) १९:०८, २७ जून २०२४ (IST)[reply]

नवीन लेख

[संपादन]

नमस्कार,

नवीन लेख करताना त्यांत उपयुक्त साचे आणि दुवे तसेच वर्ग हे कटाक्षाने घालावे.

या संदेशाला उत्तर द्यावे. नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होऊ देऊ नये.

धन्यवाद.

cc: @संतोष गोरे: अभय नातू (चर्चा) ०१:२१, २९ जुलै २०२४ (IST)[reply]

नमस्कार, आपण मराठी विकिपीडियावर भरीव योगदान देत आहात. लेखन देखील बऱ्यापैकी असून त्यात सुधारणा दिसून येत आहेत, करिता आपले अभिनंदन. सध्याच्या लेखात अजून योग्य ते संदर्भ जोडावेत. जोडताना काही चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येतील, परंतु अधिकाधिक संदर्भ जोडणे आवश्यक असते. तसेच लेखाच्या शेवटी संदर्भ साचा आणि जमल्यास उपलब्ध वर्ग देखील जोडावेत. वर्ग सापडत नसल्यास {{वर्ग}} असे महिरपी कंसात वर्ग लिहावे. तूर्तास इतकेच. पुढील लेखनास शुभेच्छा.-संतोष गोरे ( 💬 ) १९:३७, ३० जुलै २०२४ (IST)[reply]
नमस्कार, मी नुकतेच मंडी राज्य या लेखात केलेले बदल पहावेत. अशा प्रकारे आपण लिखाण केल्यास अधिक बरे होईल.-संतोष गोरे ( 💬 ) १७:५१, १६ ऑगस्ट २०२४ (IST)[reply]